Uddhav Thackeray, Eknath Shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Eknath Shinde Video : उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीसांचा एकत्रित विमान प्रवास, एकनाथ शिंदेंनी अखेर मौन सोडले, म्हणाले,...

Eknath Shinde Uddhav Thackeray Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीसांचा एकत्रित विमान प्रवासाबाबत एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ठाकरेंवर टीका करत नियम चांगली असावी लागते, असा टोला लगावला.

Roshan More

Eknath Shinde News : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी एकाच विमानाने प्रवास केला. मुंबईहून नागपूरला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात फडणवीस-ठाकरे प्रवास करत होते. या प्रवासाविषयी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की,आमच्यात उच्चस्तरीय चर्चा झाली. कालच्या बैठकीत जे ठरले ते येत्या काही दिवसांत कळेल.

दरम्यान, ठाकरे-फडणवीसांच्या एकत्रित विमान प्रवासाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, 'विमानापेक्षा इमान महत्त्वाचं असतं. आणि त्यामुळे 2019 ला महाराष्ट्राती जनतेने एकाच विमानातून प्रवास करण्याचे टिकीट दिलं होतं. परंतु त्यांनी काँग्रेसच्या बुडत्या जहाजातून प्रवास सुरू केला.'

'आता ते गटांगळ्या खात सुटले आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु देवेंद्रजी खुप हुशार आहेत. देवेंद्रजी २०१९ ला कपटी मित्र किती घातक असतो. हे पाहिलेलं आहे.', असा टोला देखील शिंदेंनी ठाकरेंना लगावला.

संजय शिरसाट काय म्हणाले?

शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी देखील फडणवीस-ठाकरे यांच्या एकत्रित विमान प्रवासावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच विमानातून प्रवास करत असतील तर त्यात गैर काहीच नाही. महाराष्ट्राची संस्कृती सांगते की, आमचं राजकीय भांडण असावं. पण वैयक्तिक काही नसावं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT