Eknath shinde, Raj Thackeray And Uddhav Thackeray sarkarnama
महाराष्ट्र

Shinde-Thackeray Alliance : उद्धव ठाकरेंच्या 'मेगा प्लॅन'ला एकनाथ शिंदेंचा सुरुंग, राज ठाकरेंना स्नेहभोजनाचे निमंत्रण, मनसेसोबत युतीसाठी हालचाली?

Eknath Shinde Raj Thackeray Shivsena MNS : आपली शिवसेना ही खरी शिवसेना आहे. त्यामुळे राज ठाकरे हे आपल्यासोबत येतील, असा विश्वास एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांना वाटतो आहे.

Roshan More

BMC Election : आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिने उद्धव ठाकरेंनी मनसेसोबत युती करण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिना निमित्त 'सामना'मधून राज ठाकरेंना युतीसाठी पुन्हा साद घातली आहे. मराठी मतांचे एकत्र आली तरी मुंबईवर पुन्हा सत्ता येईल, असा उद्धव ठाकरेंचा मेगा प्लॅन आहे. मात्र, या प्लॅनला एकनाथ शिंदे सुरुंग लावण्याच्या तयारीत आहेत.

राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत युती करण्यापेक्षा आपल्यासोबत युती करावी यासाठी शिंदे प्रयत्न करत आहेत. त्यासाठी मंत्री उदय सामंत यांच्यावर विशेष जबाबदारी टाकण्यात आली असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे राज ठाकरेंना स्नेहभोजनासाठी एकनाथ शिंदे निमंत्रित करणार आहेत. या स्नेहभोजनातून युतीचा मार्ग प्रशस्त केला जाणार आहे.

आपली शिवसेना ही खरी शिवसेना आहे. त्यामुळे राज ठाकरे हे आपल्यासोबत येतील, असा विश्वास एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांना वाटतो आहे. मराठीचे हित आणि हिंदुत्व यामुळे राज ठाकरे आणि आपल्या शिवसेनेत एकवाक्यता असल्याचे देखील नेते सांगत आहेत. उद्धव ठाकरेंना रोखण्यासाठी भाजप देखील पडद्यामागून हालचाली करत असून राज यांनी थेट भाजपसोबत येण्यापेक्षा शिंदेंसोबत गेले तर उद्धव ठाकरेंना रोखण्यात यश येईल, असे भाजपमधील नेत्यांचे मत आहे.

स्नेहभोजन पाॅलिटीक्स...

राज ठाकरे यांच्या घरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एप्रिल महिन्यात गेले होते. स्नेहभोजनासाठी शिंदे राज ठाकरेंच्या घरी गेल्याचे सांगितले जात होते. त्यावेळी उदय सामंत हे देखील उपस्थित होते. त्यानंतर शिंदे-राज ठाकरे यांच्यामध्ये मुंबई महापालिकेसाठी युती होणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, नंतर राज ठाकरेंनी युतीसंदर्भात मराठी माणसाच्या हितासाठी उद्धव ठाकरेंसोबत जाण्यास तयार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे शिंदेंसोबतच्या युतीच्या चर्चेला ब्रेक लागला होता. आता राज ठाकरेंना स्नेहभोजनाचे निमंत्रण देत शिंदें युतीसाठी एक पाऊल पुढे टाकत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT