Eknath Shinde Politics Sarkarnama
महाराष्ट्र

Eknath Shinde Politics : एकनाथ शिंदेंचे धक्कातंत्र, काँग्रेस सोडलेला मोठा नेता गळाला! चर्चेसाठी विश्वासू माणूस पाठवला

Congress Abhay Patil : विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. लोकसभा निवडणूक लढलेले अभय पाटील हे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

Roshan More

Abhay Patil News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हालचाली करत काँग्रेसची साथ सोडणाऱ्या मोठ्या नेत्याला आपल्या पक्षात घेण्याची तयारी सुरू केली आहे. अकोला मतदारसंघातून 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून अकोला मतदारसंघातून निवडणूक लढवलेले डॉ. अभय पाटील लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेशाबाबात निर्णय घेणार आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जाणारे ॲड. निलेश देशमुख यांनी डॉ. अभय पाटील यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याने पाटील यांचा शिवसेना प्रवेश निश्चित मानला जात आहे.

शनिवारी रात्री डॉ. अभय पाटील यांच्या निवासस्थानी रात्री ही भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड तब्बल दोन तास बंद दाराआड चर्चा झाली. विशेष म्हणजे, चर्चेनंतर दोघांनी एकत्र जेवणही केल्याने अकोल्याच्या राजकीय वर्तुळात या भेटीला 'डिनर डिप्लोमसी'ची उपमा दिली जात आहे.

शिंदेंच्या भेटीनंतर हालचालींना वेग

डॉ. अभय पाटील काही दिवसांपूर्वी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीत दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाल्याचे सांगितले जाते. डॉ. पाटील यांच्या आगामी राजकीय भूमिकेबाबत या भेटीत चर्चा झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती.

लवकरच निर्णय

डॉ. अभय पाटील यांनी सुमारे वर्षभरापूर्वी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. त्यांनी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत हा निर्णय घेतला होता. मात्र, राजीनाम्यानंतर त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केलेला नाही.दोन दिवसांत डॉ. पाटील आपल्या समर्थकांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेशाबाबत निर्णय घेतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT