Eknath Shinde Upset : महायुतीमध्ये सर्वकाही अलबेल नसल्याचे दिसून येत आहे. पालकमंत्र्यांच्या नावांची यादी प्रसिद्ध होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोसला गेले. तर, पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीमुळे नाराज असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या सातारा जिल्ह्यातील दरे गावी गेल्याच्या चर्चा होत्या. शिंदे यांनी आपल्या कामानिमित्त गावी आलो असल्याचे स्पष्ट केले असले तरी शिंदेंच्या नाराजीची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीला देवेंद्र फडणवीसांनी स्थगिती दिली आहे. मात्र, नाशिकचे पालकमंत्रिपद भाजप आपल्याकडे ठेवण्यावर ठाम असल्याचे सांगितले जात आहे. फक्त पालकमंत्रीपद नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या अन्य दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ असल्याची चर्चा आहे
एसटी महामंडळात झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराची दखल घेत देवेंद्र फडणवीस यांनी एसटी बसेस खरेदीची निविदाच रद्द करत चौकशीचे आदेश दिले होते. तसेच शिंदेंचे विश्वासू संजय शिरसाट यांना आदेश काढून तातडीने 'सिडको'च्या अध्यक्षपदावरुन पदमुक्त होण्यास भाग पाडले, या निर्णयांमुळे शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे.
त्यातच रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी शिवसेना आग्रही होती मात्र ते पालकमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्याने शिंदेंच्या नाराजीत भरच पडली.
एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना ते नाराज असल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचे सांगितले. तसेच आपल्या भागात नवीन महाबळेश्वरचा प्रोजेक्ट तयार होत आहे त्यासाठी आपण येथे आलो आहोत भविष्यात देखील वारंवार येणार असल्याचे म्हटले. पालकमंत्रिपदावरून नाराजी असले तर त्यात गैर काय, असे देखील शिंदेंनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.