Maharashtra Election  Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Election 2024 : रश्मी शुक्लांविषयी तक्रार मिळाली; कारवाईबाबत निवडणूक आयोगाचं मोठं भाष्य...

Pradeep Pendhare

Mumbai News : राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या हकालपट्टीच्या काँग्रेसच्या मागणीवर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीत हेलिकॉप्टरने पैसेच घेवून फिरत असल्याची तक्रार होती, यावर निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत मोठं भाष्य केलं.

राज्याचा दोन दिवसांचा दौरा केल्यानंतर निवडणूक आयोगाच्या पथकाने मुंबईत पत्रकार परिषद घेतली. राज्यातील निवडणुका किती टप्प्यात होतील, हे लवकरच आम्ही सांगू, असं भाष्य आयुक्त राजीव कुमार यांनी केलं.

महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची हाकलपट्टी करण्याची मागणी काँग्रेसने (Congress) निवडणूक आयोगाकडे केली आहे. ही तक्रार प्राप्त आहे. परंतु आम्ही वैयक्तिक मुद्यांवर आणि तक्रारींवर पत्रकार परिषदेत भाष्य करत नसल्याचा राजीव कुमार यांनी म्हटलं. "आम्हाला तक्रार मिळाली आहे, लेखी स्वरूपात मिळाली आहे. राज्यात अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. जेव्हा लागू होईल, तेव्हा निवडणूक आयोग योग्य तो निर्णय घेईल. परंतु निवडणूक आयोग एखाद्या पक्षाच्या वैयक्तिक तक्रारीवर काम करत नाही", असं राजीव कुमार यांनी स्पष्ट केलं.

लोकसभा निवडणुकीच्या (Election) काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकाॅप्टरमधून पैसे वितरीत झाल्याच्या तक्रारी होत्या. अशा पद्धतीच्या तक्रारींवर काय कारवाई करणार, या प्रश्नावर राजीव कुमार म्हणाले, देशाच्या सुरक्षा यंत्रणा वळगता, सर्वच प्रकाराची वाहतुकीची आणि इतर घटकांची निवडणुकीच्या काळात तपासणी होणारच, तसे स्पष्ट निर्देश दिले आहेत. हेलिकाॅप्टरची देखील तपासणी होणार, किती व्हीआयपी असून देत, तपासणी होणार, लोकसभा निवडणुकीच्या काळात देखील तपासणी झाली. व्हीआयपींची तपासणी करताना घाबरून नका, अशा स्पष्ट सूचना असल्याचे राजीव कुमार यांनी सांगितलं.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन वर्षांपेक्षा जास्त एका ठिकाणी असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्याबाबत देखील राजीव कुमार यांनी राज्याचे मुख्य सचिवांना दिलेल्या निर्देशांची माहिती दिली. तीन वर्षांपेक्षा जास्त एका ठिकाणी झालेल्या अधिकारी, कर्माचारी यांच्या बदल्यांचे प्रमाणपत्र राज्याकडून निवडणूक आयोगाला प्राप्त झालेले नाही. यासंदर्भात राज्याच्या मुख्य सचिंवा निर्देश दिले आहेत. बदलांच्या नियमांमध्ये कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही. एक ते दोन दिवसांत बदल्यांची कार्यवाही करावी, अशा सूचना आहेत. त्यावर अंमलबजावणीचे आश्वासन मुख्य सचिवांकडून मिळाल्याचे आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले. या बदल्यांमध्ये पारदर्शकता ठेवण्याच्या सूचना देखील केल्या असल्याचे राजीव कुमार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT