Election news Maharashtra : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी दिवाळीपूर्वीच आचारसंहिता लागू होईल आणि दिवाळीनंतर नोव्हेंबरमध्ये निवडणूक होईल, असे संकेत आहे. राज्य निवडणूक आयोगामधील सूत्रांकडून देखील अशी माहिती मिळते आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समितीसह नगर पालिका, नगर परिषद आणि महापालिकांच्या निवडणुकीची प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण करण्यात येत आहे. राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष, समिती सभापतीपदाचे आरक्षण जाहीर पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून, यावर वेगवेगळ्या न्यायालयात दाखल याचिकांवर सुनावणी होवून त्या फेटाळण्यात आल्याने आता निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
जानेवारी 2026अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मागील आठवड्यात राज्य निवडणूक आयोगाला (Election Commission) दिले. त्यानंतर निवडणुकीच्या तयारीसाठी राज्य निवडणूक आयोगाने कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर अशी महसूल विभागनिहाय ऑनलाईन बैठकांचा सपाटा लावला आहे.
या बैठकामध्ये जिल्हानिहाय मतदान यंत्रे (EVM) किती आहेत, त्यापैकी नादुरुस्त किती आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगर पंचायत आणि महापालिकेसाठी मतदान केंद्रे किती होतील, त्यानुसार अतिरिक्त ईव्हीएम किती लागतील, याचा आढावा घेतला जात आहे.
तसेच ईव्हीएम ठेवण्यासाठी सुरक्षित गोदाम आहेत की नाहीत, याचीही माहिती घेण्यात आलेली आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा परिषदेसाठी किती निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक अधिकारी लागणार, नगरपालिका, नगर पंचायत आणि महापालिकांसाठी किती अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे, याची माहिती घेतली जात आहे.
आवश्यक अधिकारी आहेत की नाहीत, किती ठिकाणी अधिकारी कमी आहेत, त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांची कोणती पदे रिक्त आहेत, याचा तपशील निवडणूक आयोगाने घेललेला असून रिक्त पदे भरण्यासोबत निवडणुकीच्या तयारीचे कामाने वेग घेतला आहे. दरम्यान, जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणासाठी लवकरच आरक्षण सोडत काढली जाणार आहे. यानंतर दिवाळीच्या आतबाहेर निवडणूक आचारसंहिता लागण्याची शक्यता व्यक्त होत. दिवाळीपूर्वी आचारसंहिता लागण्याचे संकेत मिळू लागल्याने इच्छुकांकडून देखील फिल्डिंग लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.