No1 Marathi News Website Esakal
महाराष्ट्र

ESakal: देशातील नेटकऱ्यांची सर्वाधिक आवडती मराठी वेबसाईट 'ई-सकाळ'चं ; ‘कॉमस्कोअर’ कडून शिक्कामोर्तब

Maharashtra No 1 Marathi News Website ESakal: ई-सकाळला १३.५ मिलियन युनिक युजर्सचा प्रतिसाद मिळाला आहे.‘कॉमस्कोअर’च्या अहवालानुसार हे भारतातील सर्वाधिक वाचले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल ठरले आहे.

Mangesh Mahale

Pune News: मराठी वाचकांचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या ई-सकाळ डॉट कॉमने आता प्रतिष्ठेच्या कॉमस्कोअर क्रमवारीतही बाजी मारली आहे. कॉमस्कोअरच्या अहवालानुसार देशातील सर्वाधिक वाचली जाणारी मराठी न्यूज वेबसाईट म्हणून ई-सकाळनं अव्वल स्थान पटकावलं आहे.

नवनवे प्रयोग करणे व बदलत्या तंत्रज्ञानाला आत्मसात करून वाचकांपर्यंत दर्जेदार मजकूर पोचवण्यासाठी 'ई-सकाळ' सातत्याने प्रयत्नशील आहे. वाचकांनीही याच प्रयत्नांवर पसंतीची मोहोर उमटवली आहे.

जानेवारी २०२५ मधील आकडेवारीनुसार ई-सकाळ डॉट कॉम हे भारतातील सर्वाधिक वाचले जाणारी मराठी न्यूज वेबसाईट ठरली आहे.दर्जेदार मजकूर, निर्भीड-नि:पक्ष पत्रकारिता आणि वाचकांचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या ई-सकाळ डॉट कॉमने याच वर्षी जानेवारीमध्ये २५ वर्षे पूर्ण झाली आहेत.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

२६ जानेवारी २००० रोजी सुरु झालेल्या या वेबसाईटने गेल्या २५ वर्षांत डिजिटल क्षेत्रांत विविध प्रयोग करून आघाडी घेतली. नवनवे प्रयोग करणे व बदलत्या तंत्रज्ञानाला आत्मसात करून वाचकांपर्यंत दर्जेदार मजकूर पोचवण्यासाठी 'ई-सकाळ' सातत्याने प्रयत्नशील आहे. वाचकांनीही याच प्रयत्नांवर पसंतीची मोहोर उमटवली आहे.

Comscore च्या अहवालानुसार, सकाळ मीडिया समूहाच्या डिजिटल पत्रकारितेतील ई-सकाळने प्रमुख मराठी डिजिटल माध्यमांपेक्षा आघाडी घेतली आहे. जानेवारी २०२५ या महिन्याचा अहवाल नुकताच जाहीर झाला असून त्यात ई-सकाळ डॉट कॉमला सर्वाधिक वाचकवर्ग असल्याचे सिद्ध झाले आहे. एका महिन्यात तब्बल १.३५ कोटी युझर्सने ई-सकाळ डॉट कॉमला भेट दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT