No1 Marathi News Website Esakal
महाराष्ट्र

ESakal: ई-सकाळ ठरलं देशातील सर्वाधिक वाचले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल; ‘कॉमस्कोअर’च्या अहवालात नंबर वन

Maharashtra No 1 Marathi News Website: ‘कॉमस्कोअर’च्या अहवालानुसार हे भारतातील सर्वाधिक वाचले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल ठरले आहे. ई-सकाळला १३.५ मिलियन युनिक युजर्सचा प्रतिसाद मिळाला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra No 1 Marathi News Portal: वाचकांना केंद्रस्थानी ठेवून आपला देदीप्यमान वारसा यशस्वीपणे पुढे घेऊन जाणाऱ्या ‘सकाळ’चे ऑनलाइन अंग असलेल्या ई-सकाळने नुकताच 25 वर्षांचा टप्पा गाठला आहे.

'ई-सकाळ'च्या उल्लेखनीय वाटचालीत आपल्या सगळ्यासाठी आणखी एक गुड न्यूज आहे. ई-सकाळ हे भारतातील सर्वाधिक वाचले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल ठरलं आहे. तंत्रज्ञान अन् नव्या माध्यमांचा योग्य वापर करत, ई-सकाळनं हे यश गाठलं आहे.

Comscore च्या अहवालानुसार, सकाळ मीडिया समूहाच्या डिजिटल पत्रकारितेतील ई-सकाळने प्रमुख मराठी डिजिटल माध्यमांपेक्षा आघाडी घेतली आहे. लोकमत (११ मिलियन), लोकसत्ता (६.८ मिलियन), टीव्ही९ मराठी (७.४ मिलियन) आणि एबीपी माझा (७.२ मिलियन) यांना मागे टाकत महाराष्ट्रातील वाचकांमध्ये आपली महत्त्वपूर्ण उपस्थिती नोंदवली आहे.

Comscoreच्या अहवालानुसार, ई-सकाळला १३.५ मिलियन युनिक युजर्सचा प्रतिसाद मिळाला आहे. लोकमत (११ मिलियन), लोकसत्ता (६.८ मिलियन), टीव्ही९ मराठी (७.४ मिलियन) आणि एबीपी माझा (७.२ मिलियन) यांना ई-सकाळनं (१३.५ मिलियन) मागे टाकले आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सकाळ मीडिया समूहाने डिजिटल माध्यमातील नव्या पर्वाची सुरुवात २६ जानेवारी २००० रोजी केली. यावेळी इंटरनेट नव्याने विकसित होत असताना सकाळने दूरदृष्टी ठेवत ई-सकाळच्या माध्यमातून डिजिटल पत्रकारितेत पहिले पाऊल टाकले.

गेल्या २५ वर्षांमध्ये, ई-सकाळने डिजिटल पत्रकारितेच्या प्रत्येक टप्प्यावर प्रगती करत मराठी वाचकांसाठी ताज्या घडामोडींसह विश्वासार्ह आणि दर्जेदार माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. ई-सकाळने डिजिटल क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमठवला आहे.

काय आहे Comscoreचा अहवाल

Comscore हा डिजिटल मीडिया क्षेत्रातील एक मान्यताप्राप्त प्लॅटफॉर्म आहे, जो विविध डिजिटल न्यूज पोर्टल्सचे प्रदर्शन, युजर्स आणि त्यांचा सहभाग मोजतो. Comscoreच्या ताज्या अहवालानुसार, ई-सकाळ हे सर्वाधिक वाचकांचा विश्वास संपादन करणारा मराठी न्यूज पोर्टल ठरलं आहे.

यशाचा आलेख उंचावत...

ई-सकाळनं आपल्या यशाचा आलेख सातत्याने उंचावत ठेवला. नुकताच आपला रौप्य महोत्सव साजरा केला. यानिमित्ताने एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष कार्यक्रमात डिजिटल मीडियाच्या बदलत्या स्वरूपावर या क्षेत्रातील अभ्यासकांनी मार्गदर्शन केले. चर्चा करीत भविष्यातील पत्रकारितेच्या दिशेचा वेध घेतला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT