Milind Sathe appointed as Maharashtra’s new Advocate General after cabinet approval. Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Government : महाराष्ट्र सरकारसाठी कोर्टात लढणार धडाकेबाज वकील : CM फडणवीसांकडून शिक्कामोर्तब

Maharashtra Government : बिरेंद्र सराफ यांच्या राजीनाम्यानंतर राज्य सरकारने मिलिंद साठे यांची नवीन महाधिवक्ता म्हणून नियुक्ती केली. नागपूर येथील मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली.

Hrishikesh Nalagune

बिरेंद्र सराफ यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या महाधिवक्तापदी राज्य सरकारने मिलिंद साठे यांची नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील रामगिरी या शासकीय निवासस्थानी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला अंतिम मंजुरी देण्यात आली.

बिरेंद्र सराफ यांनी सप्टेंबर 2025 मध्ये वैयक्तिक कारणास्तव महाधिवक्ता पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, नवीन नियुक्ती होईपर्यंत जबाबदारी सांभाळण्याची विनंती राज्य सरकारने त्यांना केली होती. त्यानुसार, सराफ यांनी आतापर्यंत महाधिवक्ता म्हणून काम पाहिले. आता मिलिंद साठे या पुढे विविध न्यायालयांमध्ये महाराष्ट्र सरकारची बाजू मांडणार आहेत.

मिलिंद साठे यांनी यापूर्वी अनेक वर्षे मुंबई उच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून काम केले आहे. कायद्याचा सखोल अभ्यास आणि न्यायालयीन प्रक्रियेवरील प्रभुत्व यासाठी ते ओळखले जातात. विविध विषयांमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची कायदेशीर मित्र म्हणून नियुक्ती केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही साठे यांनी काम केले आहे.

महाराष्ट्र सरकारची सर्वोच्च, उच्च आणि विविध जिल्हा न्यायालयामध्ये बाजू मांडण्यांची आणि महाराष्ट्र सरकारला कायदेशीर सल्ला देण्याची मुख्य जबाबदारी महाधिवक्ता यांच्यावर असते.

सराफ यांनी अचानक दिला होता राजीनामा :

बिरेंद्र सराफ यांनी सप्टेंबर महिन्यात अचानक राजीनामा दिला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना थेट मंत्रिमंडळात सराफ यांच्या राजीनाम्याची माहिती दिली होती. वैयक्तिक कारणामुळे आपण राजीनामा देत असल्याचे सराफ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना कळवले होते. मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या निर्णयात सराफ यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT