FASTag Annual Pass  Sarkarnama
महाराष्ट्र

FASTag Rules : सावधान! 10 एप्रिलपासून बदलतोय फास्टॅगचा नियम; तुमच्याकडे बॅलन्स नसेल तर...

What happens if fastag balance is low : 10 एप्रिलपासून नवीन FASTag नियम लागू करण्यात आला आहे. वाहनचालकांनी FASTag balance कमी असल्यास दुप्पट दंड भरावा लागू शकतो. जाणून घ्या संपूर्ण माहिती.

Rashmi Mane

10 एप्रिलपासून देशभरातील टोल व्यवस्थेत महत्त्वाचा बदल लागू झाला आहे. आता सर्व राष्ट्रीय महामार्गांवरील टोल प्लाझावर रोख रक्कम देऊन टोल भरण्याची सुविधा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. सरकारने डिजिटल पेमेंटला प्राधान्य देत फास्टॅग प्रणाली अनिवार्य केली आहे. त्यामुळे वाहनधारकांनी वेळेत फास्टॅग काढणे आणि त्यात पुरेसा बॅलन्स ठेवणे अत्यावश्यक झाले आहे.

नवीन नियमांनुसार, टोल भरण्यासाठी फास्टॅग हा मुख्य पर्याय राहणार आहे. जर एखाद्या वाहनाकडे फास्टॅग नसेल, तर चालकाला यूपीआयच्या माध्यमातून पेमेंट करता येईल; मात्र अशावेळी टोल रकमेपेक्षा 1.25 पट म्हणजेच 25 टक्के अधिक पैसे मोजावे लागतील. त्यामुळे अतिरिक्त खर्च टाळण्यासाठी फास्टॅग वापरणेच फायदेशीर ठरणार आहे.

तसेच, जर वाहनधारकाने फास्टॅग लेनमध्ये प्रवेश केला आणि त्याचा फास्टॅग ब्लॅकलिस्टेड असेल किंवा त्यात किमान शिल्लक नसेल, तर दुप्पट टोल आकारला जाऊ शकतो. ही दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी फास्टॅग नियमितपणे रिचार्ज ठेवणे गरजेचे आहे.

डिजिटल पेमेंट न केल्यास संबंधित वाहनधारकाला ई-नोटीस पाठवली जाईल. ही रक्कम 3 दिवसांच्या आत भरली नाही, तर ती दुप्पट होईल. तसेच 15 दिवसांपेक्षा जास्त काळ थकबाकी राहिल्यास वाहनाच्या नोंदणी डेटाबेसमध्ये त्याची नोंद होईल. यामुळे वाहन ट्रान्सफर, फिटनेस सर्टिफिकेट यांसारख्या सेवा अडचणीत येऊ शकतात.

याशिवाय, नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनांना महामार्गावर प्रवेश नाकारण्याचा किंवा लेनमधून हटवण्याचा अधिकार अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे नियमांकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT