Ashok Kharat Sarkarnama
महाराष्ट्र

Ashok Kharat: आधी पेढा खायला दिला मग खारट पाणी अन्...; अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांची मोडस ऑपरेंडी आली समोर

Ashok Kharat Case: भविष्य सांगण्याच्या बहाण्यानं शेकडो महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरात प्रकरणानं सध्या महाराष्ट्र ढवळून निघाला आहे.

Amit Ujagare

Ashok Kharat: स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याच्यावर शेकडो महिलांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करताना त्याच्यावर जी कलम लावण्यात आली आहेत तसंच त्याच्यावर जे आरोप झाले आहेत त्याची FIR कॉपी देखील आात समोर आली आहे. यातून महिलांवर अत्याचार करतानाची त्याची मोडस ऑपरेंडी देखील उघड झाली आहे. साम टीव्हीनं याबाबत वृत्त दिलं आहे.

लैंगिक शोषणाची मोडस ऑपरेंडी

एफआयआरमधील तक्रारीनुसार, कॅप्टन अशोक खरात हा ज्योषिताचा धंदा करायचा, यासाठी तो महिलांना टार्गेट करत होता. "मी कृष्णाचा अवतार, तू मागच्या जन्मातील माझी राधा", असं महिलेच्या डोक्यावर तांब्या-लोटा ठेऊन कॅप्टन खरात कानाजवळ पुटपुटायचा. त्यत्पूर्वी संबंधित महिलेला तो पेढा आणि कवडवट, खारट चव असलेलं पाणी प्यायला द्यायचा. महिलांना गायत्री मंत्री म्हणायला लावायचा आणि लगेचच स्पर्श करायला सुरुवात करायचा. महिलेसोबत आलेल्या व्यक्तींना ध्यानस्थ पूजेच्या नावाखाली कॅबिन बाहेर ठेवायचा. महिलांना पेढा आणि खारट पाणी यातून गुंगीचं औषध दिलेलं असायचं त्यानंतर महिलांना गुंगी आली की तो त्यांच्याशी लैंगिक चाळे करायला सुरुवात करायचा, अशा पद्धतीची त्याची मोडस ऑपरेंडी अर्थात गुन्हा करण्याची पद्धत होती.

शेकडो महिलांचं लैंगिक शोषण

दरम्यान, सध्या शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली हा भोंदू ज्योतिषी कॅप्टन खरात नाशिक पोलिसांच्या अटकेत आहे. त्यानं १०० हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं आहे. यावरुनच ठोस पुरावे उपलब्ध झाल्यानं आता या खरातचा खेळ खल्लास झाल्याचं बोलल जात आहे. पण या खऱातच्या दरबारात महाराष्ट्रातील अनेक बडे राजकारणी देखील हजेरी लावत होते. त्याचबरोबर कलाकार, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील मंडळींचा देखील त्याच्याजवळ राबता असायचा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT