Ajit Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Ajit Pawar News : आधी एबी फॉर्मचे वाटप आता ट्विटरवरून यादी जाहीर; अजित पवार गटाचे स्टार प्रचारक ठरले !

Political News : स्टार प्रचारकांच्या यादीत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांचा समावेश आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : महाविकास आघाडी व महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. तरी अद्याप उमेदवाराची घोषणा भाजप सोडून इतर पक्षाने अद्याप केलेली नाही. त्यातच विधानसभा रणधुमाळी सुरु असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीच्या जागावाटपाची यादी जाहीर होण्यापूर्वीच राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या स्टार प्रचारकाची यादी ठरली आहे. या यादीत राज्यातील दिग्ग्ज 27 नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.

त्या यादीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar), खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ, सयाजी शिंदे या प्रमुख नावांसह विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने 27 स्टार प्रचारकांची घोषणा केली आहे. (Ajit Pawar News)

विकासाचा राष्ट्रवादी विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी व आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारकांची यादी खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (Ncp) सोमवारी 27 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. स्टार प्रचारकांच्या यादीत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांचा समावेश आहे.

पक्षाने नुकतेच पक्षात प्रवेश केलेले ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांचीही निवड यावेळी केली आहे.त्यासोबतच मंत्री धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे हेही पक्षाचा स्टार प्रचारक म्हणून प्रचार करणार आहेत. त्यामुळे या यादीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT