Mumbai News : पहलगाम हल्ला आणि त्यानंतर राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे भारत-पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणावाचे वातावरण तयार झाले आहे. मध्यंतरी युद्धजन्यस्थितीही निर्माण झाली होती. यामुळे केंद्र सरकरासह सर्व राज्य सरकारे अलर्टवर आली होती. मात्र यादरम्यान राज्यातील मत्स्यव्यवसाय विभागातील एक सहाय्यक आयुक्त आजारपणाच्या नावाखाली वैद्यकीय रजा घेऊन थेट परदेश वारीवर होते. ज्यामुळे आता त्यांचे तातडीने निलंबित करण्यात आले आहे. यामुळे विभागात एकच खळबळ उडाली असून हे आदेश राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी काढले आहेत. तर ही कारवाई करणे नाशिकच्या मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त प्र.दा. जगताप यांच्यावर करण्यात आली आहे.
मंत्री नितेश राणे यांनी आपल्या खात्याचा पदभार घेतानाच विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कर्तव्यात कसूर खपवून घेतली जाणार नाही असा इशारा दिला होता. मात्र आजारपणाच्या नावाखाली त्यांच्याच विभागातील सहाय्यक आयुक्त प्र.दा. जगताप यांनी वैद्यकीय रजा घेऊन विदेशात मौजमजा केल्याचे समोर आले आहे. यामुळे वरिष्ठांची दिशाभूल करण्यासह देशात युद्धजन्य परिस्थिती असताना वैद्यकीय रजा घेऊन विदेशात मौजमजा केल्याने त्यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे.
सहाय्यक आयुक्त जगताप हे नाशिकच्या इगतपुरी न्यायालयात कामानिमित्त गेले होते. मात्र येथेच त्यांची शुगर कमी आणि ते चक्कर येऊन बेशुद्ध पडले. यानंतर त्यांच्या प्राथमिक उपचार केल्यानंतर ते शुद्धीवर आले. तसेच पुढील उपचारासाठी दवाखान्यात गेले होते. तसेच कार्यालयाकडून त्यांनी उपचारासाठी अर्धा दिवसाची किरकोळ रजा घेतली. तसा त्यांनी अर्ज देखील केला. पण त्यांनी आजारपणाचे सोंग करत परदेशात दौरा केल्याचे आता उघड झाले आहे.
यादरम्यान जगताप यांच्यावर वरिष्ठांची दिशाभूल केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे, कर्तव्यात कसूर करणे, कर्त्यव्यावर गैरहजर असणे असा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी नितेश राणे यांनी कारवाईचा बडगा उचलत जगताप यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई केलीय.
तसेच राणे यांनी जगताप यांच्यावर कारवाई करण्यात आली असून त्यांना मत्स्य व्यवसाय नागपूर प्रादेशिक उपायुक्त यांच्या लेखी पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही असेही आदेश दिले आहेत. तर त्यांना थेट चंद्रपूर येथील मुख्यालय धाडण्यात आले आहे. या कारवाईमुळे आता विभागातील अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.