Rohit Pawar  sarkarnama
महाराष्ट्र

Rohit Pawar On NEET Exam Scam : 'नीट' पेपर लीकवर चुप्पी माफियांसाठी? शिक्षणमंत्र्यांच्या गुळगुळीत भूमिकेवर रोहित पवारांना शंका

Rohit Pawar Demands CBI Inquiry Into NEET Exam Scam : आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठोपाठ आमदार रोहित पवार यांनी 'नीट' परीक्षेच्या घोटाळ्याची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी केली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची चुप्पी माफियांसाठी आहे का? असा सवाल केला.

Pradeep Pendhare

Rohit Pawar On NEET Exam : 'नीट' परीक्षेच्या घोटाळ्यावर आमदार सत्यजीत तांबेंपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देखील सीबीआय चौकशीची मागणी केली.

'नीट' परीक्षेतील घोटाळा केवळ ग्रेस मार्क देण्यापुरता मर्यादीत नसून बिहार आणि गुजरातमध्ये अनेक ठिकाणी पेपर लीक झाले आहेत . एवढ्या संवेदनशील विषयावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान गुळगुळीत भूमिका का घेत आहेत? शिक्षणमंत्र्यांची चुप्पी माफियांसाठी तर, नाही ना? अशी शंका आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली.

आमदार सत्यजीत तांबे यांनी 'नीट' परीक्षेत महाघोटाळा झाल्याचा आरोप करत 'सीबीआय' चौकशीची मागणी केली. यानंतर आमदार रोहित पवार यांनी 'नीट' पेपर फुटीचे मुद्देच समोर आणले. पेपर अदल्या दिवशी मुलांना एका ठिकाणी जमवून त्यांना सर्व प्रश्न देण्यात आले आणि उत्तरांची प्रॅक्टिस करवून त्यांना केंद्रावर एकत्र सोडण्यात आले. हा प्रकार समोर आल्यावर पोलिसांनी (Police) नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे चौकशी केली. पण त्यांना सहकार्य करण्यात आलं नाही. बिहार आणि गुजरातमध्ये अनेक ठिकाणी पेपर लीक झाल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला.

'नीट' परीक्षेचा विषय ग्रेस मार्क देण्यापुरता आहे. कुठेही पेपर लीक झाला नाही, असा दावा भाजप (BJP) नेते केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केला. एवढ्या संवेदनशील विषयावर केंद्रीय मंत्र्यांची गुळगुळीत भूमिका माफियांसाठी तर नाही ना, असा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. यामुळे 'नीट' ग्रेस मार्क प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी झाली पाहिजे. महाराष्ट्रातील पदभरती परीक्षांमध्ये होत असलेल्या घोटाळ्यांचा माफिया राज आता संपूर्ण देशात पसरत आहे की काय, अशी शंका देखील आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.

'नीट' परीक्षेबाबत आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोप केला आहे. गुजरातमध्ये काही केंद्रावरील मुलांना पेपर द्यायला लावले. परंतु पेपर कोरा ठेवण्यास सांगितेल. पेपर झाल्यावर ती उत्तरे भरण्यास आली. पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा देखील दाखल केला आहे. त्यामुळे हा विषयाची संवेदनशीलता किती मोठी आहे आणि त्यातील घोटाळ्याची व्यापकता मोठी असल्याने सीबीआय चौकशी झाली पाहिजे, असेही आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT