Former BJP spokesperson Aarti Sathe appointed as a judge of the Bombay High Court. sarkarnama
महाराष्ट्र

Aarti Sathe High Court Judge : भाजपच्या माजी नेत्या आता मुंबई हायकोर्टात न्यायाधीश, केंद्र सरकारने दिली मंजुरी

Former BJP Spokesperson Appointed High Court Judge : भाजपच्या माजी प्रवक्त्या आरती साठे यांची मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीला विरोधी पक्षांनी विरोधी केला होता.

Roshan More

Aarti Sathe New : भाजपच्या माजी प्रवक्त्या आरती अरुण साठे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी निुयक्ती झाली आहे. त्यांच्या नियुक्तीला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यांना दोन वर्षांसाठी अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती केली आहे. कामगिरीच्या आधारावर त्यांची कायमस्वरुपी न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती केली जाणार आहे.

आरती साठे यांचे नाव न्यायधीशपदासाठी केंद्र सरकारला पाठवल्यानंतर विरोधी पक्षांनी त्यावर जोरदार आक्षेप घेतला होता. भाजपच्या माजी प्रवक्त्या यांना न्यायाधीशपदी नियुक्ती करून न्यायलयाला राजकीय आखाडा बनवण्याचे काम करण्यात येत असल्याचे विरोधकांनी म्हटले होते. तर भाजप नेत्यांनी पूर्वीच्या काही न्यायाधीशांच्या नियुक्तीचे संदर्भ देत ते काँग्रेसशी संबंधित होते असा पलटवार केला होता.

रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले होते की, 'जेंव्हा उच्च न्यायालयातील न्यायाधीश पदावरील व्यक्ती राजकीय पार्श्वभूमी आणि सत्ताधारी पक्षातील पदाचा उपभोग घेतलेली असेल तेंव्हा न्यायदानाची प्रक्रिया राजकीय आकस बाळगून होणार नाही, याची खात्री कोण देणार? एका राजकीय व्यक्तीच्या नियुक्तीने पुर्ण न्यायदानाच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार नाही का?'

तीन नवे न्यायाधीश

मुंबई सुप्रीम कोर्टाला तीन न्यायाधीश मिळाले आहे. त्यामध्ये आरती साठे यांच्यासोबत अजित भगवानराव कडेठाणकर, सुशील मनोहर घोडस्वार यांचा समावेश आहे. कडेठाणकर आणि घोडेस्वार यांच्या नियुक्तीला देखील केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT