Mumbai News : माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची पक्षाने प्रदेश प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांची नियुक्ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. या नव्या जबाबदारीमुळे ते राज्यातील पक्ष संघटनेच्या कार्यात अधिक सक्रिय भूमिका निभावतील.
रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) हे डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून, त्यांनी 2002 साली राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटनेला अधिक बळकटी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी डोंबिवली मतदारसंघातून चौथ्यांदा विजयी झाले. त्यामुळे त्यांची राज्य मंत्रीमंडळात वर्णी लागेल अशी शक्यता होती. मात्र, ऐनवेळी त्यांची मंत्रिपदाची संधी हुकली होती. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
भारतीय जनता पार्टी (Bjp) संघटन पर्व महाराष्ट्र प्रभारीपदी माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप महाराष्ट्रात आगामी काळात संघटनात्मक कार्यात अधिक बळकटपणा आणण्याचा प्रयत्न करेल, अशी अपेक्षा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे.
तत्कालीन एकनाथ शिंदे सरकारमध्ये ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. कोकणात भाजपला मोठे यश मिळाले आहे. या यशात त्यांचा मोठा वाटा असल्याचे मानले जाते. रवींद्र चव्हाण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.