Gas Shortage Police Black Market sarkarnama
महाराष्ट्र

Gas Cylinder Shortage : सावधान! गॅस सिलेंडरचा काळाबाजार, प्रशासन 'अ‍ॅक्शन मोड'वर, पोलिसांकडून खबरदारी

Gas Shortage Police Black Market : अमेरिका इराण युद्धामुळे गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे गॅस सिलेंडरचा काळा बाजार सुरू झाला आहे. त्याविरोधात पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे.

Roshan More

Gas Shortage News : इराणी-अमेरिका युद्धाने गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरचा काळाबाजार होत असल्याचे समोर आले आहे. घरगुती गॅस सिलेंडर वेळेत मिळत नसल्याची तक्रार ग्राहक करत आहेत. तर, काळ्या बाजार गॅस लगेच उपलब्ध होत असल्याचे दिसून येत आहे. ग्राहकांच्या तक्रारीनंतर प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले आहे.

गॅस सिलेंडरच्या काळ्या बाजाराची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे. नागपूर प्रशासनाने काळ्या बाजार करणाऱ्यांना इशारा दिला आहे. तर, नागपूर पोलिसांनी विशेष मोहित सुरू करत अवैध साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे.

साठेबाजी करणाऱ्यांची धाबे दणाणले आहेत. पोलिस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी अवैध साठेबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश दिलेत.

वितरक, गोदामे आणि संशयित ठिकाणी पोलिसांकडून अचानक छापा टाकण्यात येणार आहे. तसेच सिलिंडरेची अवैध विक्री होत असल्याचे अढळल्यास थेट कारवाई होणार आहे.

मुंबईतील हाॅटेल सेवा ठप्प...

व्यवसायिक गॅस सिलेंडरचा तुटवड्यामुळे हाॅटेल व्यवसायिक देखील हवालदिल झाले आहे. मुंबईतील हाॅटेल व्यवसायाला यामुळे मोठा फटका बसला असून अचानक गॅस पुरवठा खंडित झाल्याने अनेक हाॅटेल्स बंद ठेवण्याची वेळ हाॅटेल चालकांवर येणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT