Girish Mahajan
Girish Mahajan sarkarnama
महाराष्ट्र

पोलिसांनी टेम्पोभर कागदपत्रे जमा केली.. पण महाजन यांना ते हात लावू शकणार नाहीत

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : पुण्यातील कोथरूड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या तीन वर्षापूर्वीच्या एका फौजदारी फिर्यादीमध्ये भाजपचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना मुंबई उच्च ( न्यायालयाने (Bombay High Court) पुन्हा दिलासा दिला आहे. या प्रकरणात २४ जानेवारीपर्यंत महाजन यांच्यासह दोघांविरोधात कठोर कारवाई करू नये, असे आदेश न्यायालयाने पुणे पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे सध्या तरी महाजन यांना कोठडीत पाठविणे शक्य नाही. परिणामी महाजन यांना दिलासा मिळाला असला तरी त्यांच्या विरोधकांना सध्या हात चोळत बसावे लागणार आहे.

पुणे पोलिसांनी जळगाव जिल्ह्यात पथके पाठवून महाजन यांच्याविरुद्ध कारवाईचा फास आवळला होता. तसेच या निमित्ताने महाजन विरुद्ध एकनाथ खडसे असा वाद सुरू झाला होता. महाजन यांनी खडसे यांना ठाण्यातील रुग्णालयात पाठविण्याचा तर खडसे यांनी महाजनांना पुण्यातील बुधवार पेठेत जाण्याचा सल्ला दिला होता. ही राजकीय धुळवळ एकीकडे सुरू असताना महाजन यांनी न्यायालयीन प्रक्रिया सुरू करत अटकेपासून संरक्षणासाठी धावपळ सुरू केली होती.

कोथरूड पोलिस ठाण्यात महाजन आणि त्यांचे स्वीय सचिव रामेश्वर नाईक यांच्याविरोधात धमकावल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याविरोधात दोघांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. जानेवारी २०१८ मध्ये घडलेल्या कथित घटनेवर आता डिसेंबरमध्ये फिर्याद करण्यात आली आहे, असा युक्तिवाद महाजन यांच्या वतीने करण्यात आला आहे. बुधवारी न्या. प्रसन्ना वार्ले आणि न्या. अनिल किल्लोर यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली.

जळगावमधील निभोरा पोलिस ठाण्यात याबाबत प्रथम फिर्याद नोंदवण्यात आली होती. जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे विश्वस्त विजय पाटील यांनी ही तक्रार केली आहे. मात्र, कोथरूड परिसरात ही घटना घडल्यामुळे फिर्याद येथे वर्ग करण्यात आली आहे.
तीन वर्षांपूर्वी घडलेल्या कथित घटनेवर आता फिर्याद केली आहे. त्यामुळे ती रद्द करण्यासाठी हे पुरेसे कारण आहे, असा दावा महाजन यांच्या वतीने करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT