Advocate Asim Sarode Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics : गोकुळमध्ये 'महायुती'चा विजय, पण असीम सरोदे यांनी 2024 च्या निकालांची आठवण करून दिली; म्हणाले, 'भीषण शांतता!'

Mahayuti wins the Gokul election in Kolhapur. Advocate Asim Sarode recalls the 2024 election results and warns of an impending democratic storm : राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीची रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाई निष्फळ ठरल्यानंतर महायुतीप्रणित आघाडीने गोकुळची सत्ता मिळवली; मात्र या विजयावर असीम सरोदे यांनी प्रश्न उपस्थित करत लोकशाहीच्या आगामी संघर्षाचा इशारा दिला.

Pradeep Pendhare

Kolhapur Gokul Election2026 : कोल्हापुरमधील गोकुळच्या अध्यक्षपदासाठी निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी महायुतीने बाजी मारली. तत्पूर्वी पुलाखालून बरचं पाणी गेले. राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी आणि महायुतीप्रणित छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीने यातून एकमेकांविरोधात टाकलेले डाव, समविचारी आघाडीची रस्त्यावरची लढई, न्यायालयीन लढाई सर्व काही झाल्यानंतर, महायुतीप्रणित आघाडीने सत्ता मिळवत, कंडका पाडला. गोकुळमधील सत्तानाट्याचे राज्यभर पडसाद उमटले.

महायुतीच्या सत्ता मिळवण्याच्या डावपेचावर, सर्वच पातळीवर चर्चा सुरू आहे. कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी महायुतीने गोकुळमध्ये सत्ता संपादन केली, तरी लोकांमध्ये आनंद नाही. उलट भीषण शांतता आहे, 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूक निकालानंतर होती, तशीच! यातून लोकशाहीचे वादळ आता अटळ आहे. कमळ नाचविणारे तुम्ही नुसते वाहून जाणार, तर भुईसपाट होणार, असा इशारा दिला आहे.

कोल्हापुरच्या (Kolhapur) गोकुळमध्ये सत्ता संपादन करून महायुतीने त्यावर पडदा टाकला. पण या सत्ता संपादनाचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटत आहे. सहकारात शांतता आहे. सहकारात येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये राज्यातील सत्ताधारी महायुती काय करेल याचा प्रतिस्पर्धींना, 'गोकुळ'च्या धड्यातून अंदाज येऊ लागले आहेत.

महायुतीच्या (Mahayuti) सत्ता संपादनाच्या भुकेवर, लोकशाहीवादी विचारवंत व्यक्त होताना दिसत आहेत. कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यावर वारंवार भूमिका मांडताना दिसतात. गोकुळमधील महायुतीच्या सत्ता संपादन नाट्यावर त्यांनी एक्सवर पोस्ट व्यक्त करताना, भाजपचे नाव न घेता, सूचक असे इशारा दिला आहे.

महायुतीचा विजय! ओळखीची आहे ही शांतात!

'गोकुळ'वर आपला अध्यक्ष, तर नेमला. पण लोकांच्या मनातील उरला सुरला आदर सुद्धा गमावला. विजय मिळविला, सत्ता संपादन केली तरीही लोकांमध्ये आनंद, तर नाहीच उलट भीषण शांतता आहे. ओळखीची आहे ही शांतात! असे सांगत तीच जी 2024च्या लोकसभा निवडणूक निकालानंतर भारतभर होती व विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रभर पसरली होती, याकडे असीम सरोदे यांनी लक्ष वेधले. लोकशाहीचे वादळ आता अटळ आहे. कमळ नाचविणारे तुम्ही नुसते वाहून जाणार नाही, तर भुईसपाट होणार, असा पुढेही इशारा दिला आहे.

न्यायव्यवस्थेची निष्पक्षता दिसली पाहिजे

गोकुळच्या निवडणुकीच्या निमित्ताने, असीम सरोदे यांची आणखी एक पोस्ट चर्चेत आहे. ती थेट न्यायाधीशांची न्याय व्यवस्थेत भूमिका निष्पक्ष असली पाहिजे, असे म्हटले आहे. न्यायाधीशांनी राजकीय नेत्यांच्या, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार स्वीकारणे टाळावे. कारण न्यायव्यवस्था केवळ निष्पक्ष असणे पुरेसे नाही, तर तिची निष्पक्षता जनतेला दिसलीही पाहिजे, असे त्यात म्हटले आहे.

न्यायाधीशांनी सत्तेच्या प्रभावापासून अलिप्त असावे

असीम सरोदे यांच्या या पोस्टमागे गोकुळ निवडणुकीत सत्ताधारी व्यवस्थेबरोबरच, न्याय व्यवस्थेवर बरेच खलबती घडल्याचे असे सूचक भाष्य केलेले दिसते. याच पोस्टमध्ये पुढे, काहींना कायद्याची माहिती असल्याचा अभिमान, तर काहींना न्यायाधीश माहिती असल्याचा विश्वास! न्यायव्यस्थेला राजकारणाने घेरणे चांगली परिस्थिती नाही. न्यायव्यवस्थेची विश्वासार्हता टिकवायची असेल, तर न्यायाधीशांनी सत्तेच्या प्रभावापासूनही अलिप्त दिसले पाहिजे आणि प्रत्यक्षात अलिप्त असले पाहिजे, असे असीम सरोदे यांनी सांगून लक्ष वेधले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT