Hasan Mushrif Meets Chandrakant Patil Sarkarnama
महाराष्ट्र

Gokul Politics : गोकुळमध्ये महायुतीच्या सत्ता स्थापनेच्या हालचाली, चंद्रकांत पाटील-मुश्रीफांमध्ये चर्चा!

Hasan Mushrif Meets Chandrakant Patil : शासन नियुक्त सदस्यांमुळे गोकुळमध्ये महायुतीकडे बहुमत होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर महायुतीमधील मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतल्याची चर्चा आहे.

Roshan More

Mayuti News : गोकुळमध्ये महायुतीकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु केल्याची चर्चा आहे. आज सकाळी मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या निवास्थानी जात त्यांची भेट घेतले. या दोन्ही नेत्यांमध्ये एक तास चर्चा झाल्याची माहिती आहे. गोकुळमध्ये अध्यक्षपद मिळवण्यासाठी रणनीती देखील ठरल्याचे सांगितले जात आहे.

शासन नियुक्त सदस्यांमुळे गोकुळमध्ये महायुतीकडे बहुमत होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सतेज पाटील हे कोर्टात गेले आहेत. सरकराचा शासन नियुक्त सदस्यांना मतदान करण्याचा दिलेला अधिकार हे नियमांच्या विरोधात असून तो न्यायालयात टिकणारा नाही, असे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर देखील पाटील-मुश्रीफ यांच्यात चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

सरकारने शासन नियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकाराचा निर्णय कोर्टात टिकणार नाही, असे निरीक्षण माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नोंदवले होते. दरम्यान, यावर बोलताना हसन मुश्रीफ यांनी जरी हा निर्णय टिकला नाही तरी पण पुन्हा तेच होणार आहे. कोरम कसे पूर्ण करणार, असा सवाल उपस्थित केला.

मुश्रीफ यांन सतेज पाटलांवर निशाणा साधत म्हटले की, मुख्यमंत्री तीन मंत्री आणि दहा आमदारांना दोन्ही हाताला बांधून त्यांनी पोस्टर लावले. निवडणुकीत जय पराजय होतच असतो. पण त्याचा उन्माद असता कामा नये.

जातीवादी प्रचार मनाला लागला..

हसन मुश्रीफ यांनी निवडणुकीत जातीवादी प्रचार करण्यात आला, हे आपल्या मनाला लागल्याचे म्हटले. तसेच लोकशाही टिकवायची असेल तर शासन नियुक्त संचालक निवडण्याशिवाय आमच्याकडे मार्ग नव्हता.आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचे स्थान मिळाले असेल तर त्यांचा अध्यक्ष करण्यासाठी आमचे लोक का जातील, असे देखील त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT