Maharashtra politics : काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये येण्याच्या विधानावर, भाजपने जोरदार पलटवार केला आहे.
भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी, पृथ्वीराज चव्हाण यांच्या म्हतारपणावरच वार केला आहे. भाजपच्या हा वारला पृथ्वीराज चव्हाण कसे उत्तर देतात, याकडे आता लक्ष असणार आहे.
भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी, "राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेस पक्षाचे नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांना म्हातारपणी वेड लागलं की काय? मरणोत्तर एखाद्या राजकीय नेत्याची खोटेपणाची वावटळ उठवायची, हे फक्त काँग्रेस वालेच करू शकतात. काँग्रेसकडे काही मुद्दे नसल्यामुळे हे आरोप सुरू आहेत. म्हातारपणी प्रसिद्धी मिळवण्याची पृथ्वीराज चव्हाण यांचा हा खटाटोप आहे."
दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी आपले संपूर्ण आयुष्य भाजपसाठी (BJP) झिजवलं आहे. मुंडे साहेबांनी हाडाची काडं करून चांदा ते बांधा असा भाजप पक्ष वाढवला. देशाचे नेते होते आणि त्यांच्याबाबत आशीर्वाद उठवणे हे योग्य नाही, असा घणाघात राम कुलकर्णी यांनी काँग्रेसचे चव्हाण यांच्यावर केला आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या खोट्या वावटळीचा निषेध आहे. मी गोपीनाथ मुंडे यांच्या हाताखाली 35 वर्ष काम केलेला कार्यकर्ता आहे. ते एकच म्हणायचे की, माझा प्राण गेला की माझा देह भारतीय जनता पक्षाच्या झेंड्यांमध्येच बांधला पाहिजे, अशी आठवण प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी सांगितली.पक्ष त्यांना विचारत नाही. पक्षाने त्यांना बाजूला टाकले आहे. त्यांना हे शोभत नाही, असाही टोला राम कुलकर्णी यांनी लगावला आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपचे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत, गौप्यस्फोट करताना, मुंडे यांना काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यासाठी इच्छुक होते. त्यांच्या पक्षप्रवेशासाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना विचारण्यात आले होते. सोनिया गांधी यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या पक्षप्रवेशाला परवानगी दिली होती. पण तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या केंद्रातील मंत्रिपदाच्या अटीमुळे पक्षप्रवेशाला मान्यता दिली नव्हती, असा मोठा दावा केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.