Eknath shinde, Gulabrao Patil  Sarkarnama
महाराष्ट्र

Gulabrao Patil News : गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना; नेमके कारण काय ?

Political News: आगामी काळात होत असलेल्या महायुतीत सारं काही आलबेल आहे ना? असा सवाल उपस्थित केला जात आहे. गेल्या काही दिवसापासून महायुतीमधील घटक पक्षाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच महायुतीमधील वाद चव्हाट्यावर आला असून हा वाद थांबण्याचे नाव घेत नसल्याने सध्या काळात निवडणूक आगामी काळात होत असलेल्या महायुतीत सारं काही आलबेल आहे ना? असा सवाल उपस्थित केला जात आहे. गेल्या काही दिवसापासून महायुतीमधील घटक पक्षाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे.

गेल्या काही दिवसात महायुतीमधील वादाचा सिलसिला सुरुच आहे. भाजप (Bjp), शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून एकमेकांना टार्गेट केले जात आहे. त्यामुळे हा वाद सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे. रामदास कदम व रवींद्र चव्हाण, तानाजी सावंत व अमोल मिटकरी, उमेश पाटील तर नुकतीच मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी अर्थमंत्री पदावरून केलेली टीका मित्रपक्षाच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे.

त्यामुळेच गुलाबराव पाटलांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने मुंबईला बोलवले आहे. यावेळी 'त्या' वक्तव्यावरून त्यांची कानउघाडणी केली जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Gulabrao Patil News)

शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील रविवारी सायंकाळी जळगावहून तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत. मंत्री गुलाबराव पाटील हे विमान, रेल्वेने न जाता बाय रोड मुंबईकडे रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून मंत्री गुलाबराव पाटील यांना तातडीने मुंबईला बोलावून घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जळगावच्या एका कार्यक्रमावेळी त्यांनी अर्थ खाते नालायक असल्याबाबत वक्तव्य त्यांनी केले होते. त्यामुळे हे वक्तव्य येत्या काळात मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासाठी अडचणीचे ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या वक्तव्यामुळे एकनाथ शिंदे यांनी त्यांना मुंबईला बोलावून घेतले असण्याची शक्यता आहे.

याच वक्तव्यावरून गुलाबराव पाटील यांच्यावर महायुतीतील मित्र पक्षातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे विरोधकांकडून टीका केली जात असून महायुतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यामुळे आता ते काय खुलासा करतात? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांकडून केल्या जात असलेल्या वक्तव्यावरून इतर पक्षांना टार्गेट केले जात आहे. नुकतंच आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी एक धक्कादायक वक्तव्य केले होतं. त्यामुळे संतापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेतला होता. यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी अर्थ खात्याबाबत वक्तव्य केल्याने महायुतीत नवा वाद सुरु झाला आहे. या दोन्ही घटनांमुळे महायुतीत सारं काही आलबेल आहे ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

दरम्यान, चार दिवसापूर्वीच कॅबिनेट मीटिंगमध्ये शिवसेना शिंदे गट व अजित पवार गटातील नेत्यांत वाद झाला होता. त्यानंतर वातावरण चांगलेच तापले होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना बोलावून घेऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत केलेल्या वक्तव्यानंतर त्यांची बोलावून घेत कानउघाडणी केली होते असे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT