Gunaratna Sadavarte on ST Strike

 
Sarkarnama
महाराष्ट्र

ST Strike : गुणरत्न सदावर्ते संपावर ठाम! गुजर यांना टाळ्या वाजवून निरोप

ST Strike : अजय गुजर (Ajay Gujar) यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्यात आला असल्याची घोषणा केली आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मागच्या ५४ दिवसांपासून सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा (ST Strike)संप मागे घेण्यात आला असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर (Ajay Gujar) यांनी केली आहे. आज परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब (Anil Parab), महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने (Shekhar channe) आणि अजय गुजर यांच्यात आज तब्बल ५ तास बैठक झाली. यानंतर संयुक्त पत्रकार परिषद घेवून याबाबत ही घोषणा केली आहे. याच संघटनेच्या नोटीसीनंतर हा संप सुरु झाला होता.

मात्र, अजय गुजर यांनी माघार घेतली तरी त्यांना डावलून हा संप सुरुच राहणार असल्याची भूमिका अॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunartna sadavrte) यांनी घेतली आहे. अजय गुजर यांच्या घोषणेनंतर सदावर्ते यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, अजय गुजर यांच्या नोटीसीनंतर आंदोनलानत कोणीही आलेले नाही. त्यामुळे त्यांच्या एक्झिटमुळे कोणीही इथून जाणार नाही. ही प्रेरणा देणारी ही दुखवट्याची चळवळ आहे, ती कोणीही मोडू शकत नाही.

दरम्यान सदावर्ते यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांच्यावर टीका केली. हा सगळा खेळ शरद पवार यांचाच असून गेल्या काही दिवसांपासून त्यांची माणसे प्रेशर टाकत होती. दत्ता सामंत (datta samant) यांच्या खुनानंतर पहिल्यांदा कष्टकरी एकवटला याचे बहुदा पवारांना दु:ख वाटत आहे. म्हणूनच ते असले गलिच्छ राजकारण करत आहेत. अशा मोठ्या आंदोलनामध्ये याप्रकारच्या छोट्या गोष्टी घडत असतात. आम्ही अजय गुजर यांना आज टाळ्या वाजवून मुक्त करत आहोत.

पुढे बोलताना सदावर्ते म्हणाले, मुळात आज घोषणा केलेल्या माणसाजवळ काहीच नाही. ती फक्त ५० लोकांची संघटना आहे. मात्र ९२ हजार कर्मचारी इथेच आझाद मैदानात ठाण मांडून आहेत. कष्टकरी इथे एकवटला आहे. त्यामुळे, विलीनीकरणाचा लढा सुरुच राहणार आहे. दरम्यान यावेळी तुम्ही वकील आहात की कामगारांचे नेते? या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, एकावेळी या सगळ्या भूमिका बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb ambedkar) यांनी वठवल्या आहेत. त्यामुळे हा संप सुरुच राहणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT