Harshvardhan Sapkal News : औरंगजेबाच्या कबरीवरून महाराष्ट्राचे राजकारण पेटले आहे. हिंदुत्ववादी संघटनांकडून ही कबर उखडण्याची मागणी करण्यात येत आहे. तर, काही संघटना याला विरोध करत असून औरंगजेबाची कबरही मराठ्यांच्या शौर्याचे प्रतिक असल्याचे म्हणत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबाच्या कबरीचे महीमामंडन सहन करणार नसल्याचे इशारा देखील दिला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून हिंदुत्ववादी संघटनांना चॅलेंज करण्यात आले आहे.
'क्रूर इंग्रजांना मदत करणारे, इंग्रजांचे हस्तक असणारे, इंग्रजांकडून पेन्शन घेणारे काही जण होते. देशाला स्वातंत्र्य मिळता कामा नये ,अशी भूमिका घेणाऱ्यांच्या काही कबरी, पुतळे, समाध्या या महाराष्ट्रात आणि भारतात आहेत. त्या तोडून टाकण्यासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल भूमिका घेणार आहे का?', असे चॅलेंज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे.
'बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेने औरंगजेबाच्या कबरी बाबत जी भूमिका घेतली तशीच भूमिका इंग्रजांच्या हस्तक असणाऱ्या, पेंशन घेणाऱ्या, देशाला स्वातंत्र्य मिळू नये म्हणून काम करणाऱ्यांच्या, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्यांच्या बाबतीत घ्यावी. त्यांचे पुतळे स्मारके राज्यात आहेत, त्याबाबत सरकारने भूमिका जाहीर करावी.', असे आवाहन देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.
हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभाराची तुलना औरंगजेबाच्या राज्यकारभाराशी केली होती. त्यामुळे सपकाळ यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी भाजप नेत्यांनी केली होती. त्यावर भाजपाचे लोकच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी करत असल्याचे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले.
औरंगजेबाचा राज्यकारभार अत्यंत वाईट आणि क्रूर स्वरूपाचा होता. राज्याची परिस्थिती पाहात या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा कारभार आणि औरंगजेबाचा कारभार सारखाच असल्याचं विधान मी केले होते. त्यात कुठल्याही प्रकारची चूक नाही, असे देखील सपकाळ यांनी सांगितले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.