Harshvardhan Sapkal News: महाराष्ट्रात सध्या निवडणूक आयोगाची 'एसआयआर'प्रक्रिया सुरू आहे. याविषयी काँग्रेसने आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सत्ताधारी भाजप या प्रक्रियेत थेट हस्तक्षेप करीत असल्याचा दावा त्यांनी केला. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निवडणूक आयोगाच्या या प्रक्रियेची गंभीर दखल घ्यावी असे आवाहन यंत्रणेला केले.
पश्चिम बंगाल, बिहार आणि अन्य राज्यात अनेक मतदारांवर अन्याय झाला. त्याबाबत मोठे कारस्थान भाजपने केले होते, असा आरोप सपकाळ यांनी केला. महाराष्ट्रात एस आय आर माध्यमातून ग्रामीण भागातील सात टक्के तर शहरातील दहा टक्क्यांपर्यंत मतदारांची नावे वगळली जाण्याची शक्यता आहे. कोणती नावे वगळावीत याचा निर्णय आरएसएसच्या कार्यालयात ठरणार आहे. त्याबाबत नागपूरला मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवासस्थानी नियोजन केले.
नागपूर येथे मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवासस्थानी 'बिएलऒ'ना बोलवले होते. ते कशासाठी बोलावले होते असा प्रश्न त्यांनी केला. आरएसएस आपल्या कार्यालयात कोणत्या मतदारांची नावे वगळायची याचा निर्णय घेते. त्याची पुढे अंमलबजावणी करण्यात येते, असा दावा त्यांनी केला. निवडणूक आयोगाच्या या गंभीर कामात देखील हस्तक्षेप होत आहे. त्या माध्यमातून सबंध निवडणूक प्रक्रिया हायजॅक होत आहे. आता फक्त उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे कामकाजच तेथून चालवायचे सत्ताधाऱ्यांनी बाकी ठेवले आहे.
केंद्रातील सत्ताधारी भाजपने अनेक घोषणा केल्या होत्या. या घोषणांची अंमलबजावणी झाली का?. किती आश्वासने पूर्ण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन कोटी रोजगार दिले का? असे प्रश्न देखील सपकाळ यांनी उपस्थित केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.