Harshvardhan Sapkal criticizes Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Harshvardhan Sapkal: 'फडणवीस म्हणजे महाराष्ट्र नाही'; सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांना धमक्या देणे मुख्यमंत्र्यांना शोभत नाही!

Harshvardhan Sapkal statement on Fadnavis: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर टीका करत शेतकरी कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप केला. नार्को टेस्टचेही खुले आव्हान दिले.

Mangesh Mahale

Congress attacks Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा तापले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल करत, "सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांना धमक्या देणे मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. फडणवीस म्हणजे महाराष्ट्र नाही," अशी टीका केली. याचबरोबर त्यांनी राज्य सरकारची शेतकरी कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करीत सरकार शेतकरीविरोधी असल्याचेही म्हटले आहे.

सरकारच्या भ्रष्ट कामावर सर्वसामान्य जनता व विरोधी पक्ष बोलत असेल तर त्यांना ‘भाडे के तट्टू’, ‘बघून घेईन’ अशा धमक्या देणे राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री यांना शोभत नाही. जनतेच्या पैशाच्या हिशोब जनता विचारणारच, त्याचा एवढा राग येण्याचे काही कारण नाही परंतु देवेंद्र फडणवीस यांनी बघून घेण्याची जी भाषा केली ती अत्यंत निषेधार्ह व आक्षेपार्ह आहे.

‘तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही’ हे देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात घ्यावे, असा घणाघाती हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. सपकाळ माध्यमाशी बोलत होते.

सुसंस्कृत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या तोंडी ‘कुत्रे’, ‘भाड्याचे तट्टू’ असे शब्द शोभा देत नाहीत. ही ‘टपोरी’ लोकांची भाषा आहे. सरकारच्या कामावर बोलणे हे लोकशाहीत चुकीचे नाही. देवेंद्र फडणवीस यांना संताप येण्याचे कारण म्हणजे काँग्रेस पक्षाने मिसिंग लिंकच्या भ्रष्ट कामाची पोलखोल केली व ‘इंन्फ्रा मॅन’ म्हणून ते टेंभा मिरवतात त्यांना ‘डिझास्टर मॅन’ म्हटले हे त्यांच्या जिव्हारी लागले आहे, असे सपकाळ यांनी म्हटलं आहे.

मी केलं, मी केलं, अशी स्वताची पाठ थोपटून घेणाऱ्या फडणविसांना ते रुचले नाही. पण त्यांनी काय त्यांच्या घरच्या पैशातून काम केले का, हा तर जनतेचा पैसा आहे, तो जर वाया जात असेल तर लोक प्रश्न विचारणारच, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी हा अहंकार दाखवणे बरे नाही, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

मिसिंग लिंकच्या संदर्भात फडणवीस यांना ‘डिझास्टर मॅन’ म्हटल्याने ते, ज्याला काही समजत नाही, अक्कल नाही, त्यावर काय बोलणार असे ते म्हणाले, सर्व ज्ञान त्यांच्याकडेच आहे हा फडणवीस यांचा हेका आहे. फडणवीस यांनी माझ्यावर खोटेपणाचा आरोप केला आहे पण खोटे कोण बोलत आहे, त्यासाठी मी नार्को टेस्टला तयार आहे तुम्ही तयार आहात का, असा प्रश्न सपकाळ यांनी विचारला आहे.

ढगफूटीची अफवा

नाशिकमध्ये काँग्रेसचे आंदोलन होऊ नये म्हणून ढगफुटीची अफवा फडणवीस यांनीच पसरवली होती. वेगळा विदर्भ, आरक्षण, लाडकी बहिण यांच्याबद्दल खोटे कोण बोलले, समृद्धीत किती कोटींचा भ्रष्टाचार झाला, मिसिंग लिंकमध्ये किती भ्रष्टाचार झाला, मुंबईतील जमीन कोणाला विकल्या हे महाराष्ट्राच्या जनतेला समजू द्या, त्यासाठी नार्को टेस्ट करा, असे आव्हानही सपकाळ यांनी दिले.

शेतकरी कर्जमाफीची घोषणा फसवी..

भाजपा महायुती सरकारने केलेली शेतकरी कर्जमाफीची घोषणा फसवी आहे हे आम्ही सुरुवातीपासून सांगत आलो आहोत. सरकारने घोषणा केली पण अद्याप कर्जमाफी केलेली नाही, त्यासाठी राज्यात विविध ठिकाणी काँग्रेस व मित्रपक्ष आंदोलन करत आहेत. सरकार चर्चेला बोलावते पण चर्चाच करत नाही. भाजपा महायुती सरकार हे शेतकरी विरोधी आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT