Maharashtra minister Hasan Mushrif reacts to Sonam Wangchuk's hunger strike, saying that seeking a resignation through a fast is not an appropriate course of action. sarkarnama
महाराष्ट्र

Hasan Mushrif : राजीनाम्याच्या मागणीसाठी उपोषण करणं अयोग्य, महायुतीमधील मंत्र्याचा सोनम वांगचुक यांना टोला

Hasan Mushrif Sonam Wangchuk : नीट परीक्षा झाली आणि त्याचा निकालही लागला. त्यामुळे आता त्या परीक्षेबद्दल काही तक्रार राहिल्या नाहीत, असे हसन मुश्रीफ म्हणाले

Roshan More

Hasan Mushrif News : जंतर मंतरवर सोनम वांगचुक यांचे सुरू असलेले उपोषणच्या 21 दिवशी पोलिसांनी आज कारवाई केली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान हे राजीनामा देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्यााच इशारा अभिजित दीपके यांनी दिली आहे.

महायुतीमधील मंत्री हसन मुश्रीफ यांना सोनम वांगचुक यांच्या उपोषणाविषयी पत्रकारांनी प्रश्न विचारले असता ते म्हणाले, 'नीट परीक्षा झाली आणि त्याचा निकालही लागला. त्यामुळे आता त्या परीक्षेबद्दल काही तक्रार राहिल्या नाहीत.'

'परीक्षा योग्य प्रकारे पार पडली त्याबाबत काही तक्रारी देखील नाहीत. त्यामुळे त्या मागणीसाठी एका मंत्र्याने राजीनामा द्यावा यासाठी उपोषण करावं हे काही योग्य नाही, असं मला वाटतं.', असे मुश्रीफ म्हणाले.

'त्यांची (सोनम वांगचुक) यांची तब्येत बिघडलेली होती. त्यांच्या तब्येतीच्या कारणावरून,औषधोपचार घेत नसतील म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतला असावे. ज्यावेळी लोकांना वेठीस धरलं जातं रस्ते अडवणे, अशा गोष्टी केल्या जातात तेव्हा न्यायालय स्वतःहून याची दखल घेत असते', असेही मंत्री मुश्रीफ म्हणाले.

केंद्र सरकार असुरक्षित झाले का?

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून पोलिस बळाचा वापरू घेऊन गेल्याने सरकारवर टीका केली आहे. सत्य, अहिंसा आणि संविधानाच्या मार्गाने लढणाऱ्या एका निःशस्त्र गांधीवादी शास्त्रज्ञावर हजारो पोलिसांचा गराडा घालण्याइतके केंद्र सरकार असुरक्षित झाले आहे का? सलग २० दिवसांच्या उपोषणामुळे शरीर क्षीण झालेल्या सोनम वांगचुक यांच्यावर पोलिसी बळाचा वापर करताना केंद्र सरकारला लाज वाटली नाही का? असा सवाल त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT