संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज बीडच्या विशेष न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. याआधी 3 जून रोजी या हत्या प्रकरणाची सुनावणी झाली होती. या सुनावणी दरम्यान सरकारी वकील उज्वल निकम यांनी आरोप निश्चिती करून घ्यावी असा अर्ज न्यायालयात सादर केला होता. यावर वाल्मीक कराडच्या वकीलाकडून डिजिटल एव्हिडन्स मिळाले नसल्याचं कारण देण्यात आलं होतं. त्यामुळे आजच्या सुनावणीत कराडच्या आरोप निश्चितीबाबत युक्तीवाद होण्याची शक्यता आहे.
सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही. स्थानिक नेतृत्व, स्थानिक आमदार आणि खासदार यांच्यात एकमत झाल्याशिवाय आमच्याकडे पक्षप्रवेश होत नाही. नाशिकचे स्थानिक पदाधिकाऱ्यांचा या पक्षप्रवेशाला विरोध आहे निवडणुकीच्या राजकारणात जेव्हा आपण एकमेकांच्या विरोधात लढतो आणि आता निवडणुकीला फक्त सहा महिने झाल्यामुळे विरोधाची भावना असते आणि त्यामुळे नाशिकमध्ये त्यांना विरोधाची भावना आहे, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. मात्र, एकीकडे बडगुजर यांचा आज भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार असल्याचं सांगितलं जात असताना बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता विविध चर्चांना उधाण आलं आहे.
पंढरपूरला वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. वारकऱ्यांच्या वाहनांना राज्य सरकारने पूर्ण टोल माफ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय देखील जारी करण्यात आला आहे. त्यामुळे पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा शासनाने दिला आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार असलेल्या वाल्मीक कराडची मालमत्ता जप्त करण्यासंदर्भात बीडच्या विशेष न्यायालयामध्ये सरकारी वकिलांकडून अर्ज करण्यात आला आहे. या अर्जावरती आज न्यायालयामध्ये दोन्ही बाजूंच्या वकिलांकडून युक्तिवाद केला जाणार आहे. यावेळी सरकारी पक्षाकडून बाळासाहेब कोल्हे युक्तिवाद करणार आहेत. तर कराडकडून विकास खाडे हे युक्तिवाद करतील. शिवाय आज बीडच्या विशेष न्यायालयामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने सातवी सुनावणी होणार आहे.
सातार्यात 32 वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. याच संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची निवड करण्यात आली आहे. मसाप, शाहूपुरी शाखा, मावळा फौंडेशन यांच्या मागणीनुसार साताऱ्यात संमेलन होणार आहे. तर राजधानी साताऱ्यात होणाऱ्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची एकमताने निवड करण्यात आल्याची माहिती साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी दिली.
ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुधाकर बडगुजर अखेर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी त्यांच्या पक्षप्रवेशाला जोरदार विरोध केला होता. मात्र, हा विरोध झुगारूत बडगुजर यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. मंगळवारी दुपारी मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि गिरीश महाजन यांच्या हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडणार असल्याची माहिती आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.