माळेगाव कारखान्यात अजितदादा यांच्या पॅनलचा विजय व्हावा. पुढच्या वर्षी आषाढीची शासकीय महापूजा अजितदादांच्या हस्ते व्हावी, यासाठी आमदार अमोल मिटकरी यांचे विठ्ठलाकडे साकडे घातले. हिंदू खत्रे मे है...असे म्हणत रामाचे नाव घेणाऱ्या निलेश राणे यांनी आपल्या मोठ्या भावाचे ऐकावे सावत्र भाऊ असणाऱ्या भरत आणि राम सुद्धा एकत्र होते. मग राणे बंधू यांनी मतभेद करू नयेत, असा टोलाही मिटकरी यांनी नितेश राणेंना लगावला.
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना 2026 मध्ये नोबेल शांतता पुरस्कार मिळावा यासाठी पाकिस्तान सरकारने त्यांचे नाव सुचवले आहे. भारत-पाकिस्तान दरम्यान झालेल्या तणावाच्या काळात ट्रम्प यांनी केलेल्या मुत्सद्देगिरीच्या प्रयत्नांनी आणि मध्यस्थीमुळे मोठा युद्ध टळले, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे.पाकिस्तान सरकारने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, ट्रम्प यांनी नवी दिल्ली आणि इस्लामाबाद दोघांशीही संवाद साधून संघर्षविराम घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे दोन अण्वस्त्रसज्ज राष्ट्रांमधील युद्ध होण्याची शक्यता टळली.
राज ठाकरे हे पहिलीपासून हिंदीला विरोध करत आहेत. ते विद्यार्थ्याना शिक्षणापासून वंचित ठेवत आहेत. त्यांनी हात जोडून माफी मागितली पाहिजे. जर ते भाषिक वाद घालत असतील तर त्यांच्या पक्षावर बंदी घातली पाहिजे, असे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले. राज ठाकरेंनी शिक्षक, पालकांची माफी मागितली पाहिजे ते विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवत आहेत. हिंदी बोलेंगे, हिंदी पढेंगे कोई रोक सके तो रोकलो.. हिंदी भाषा शिकण्यात वाईट काय?’ असे आव्हान देखील सदावर्ते यांनी राज ठाकरेंना दिले.
निवडणुकीचे फूटेज 45 दिवसांत नष्ट करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला काँग्रेसने विरोध केला आहे.निवडणूक आयोग आणि मोदी सरकार मिळून लोकशाही व्यवस्थाच नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. निवडणुकीचा पुरावाच मिटवून टाकण्यात ये
आषाढी पालखी सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन घेतले. मंदिरात त्यांच्या हस्ते पालखीची पूजा झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांचा मंदिर समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, गुरु शांतिनाथ, राजेंद्र उमाप,भावार्थ देखणे, पुरुषोत्तम पाटील, रोहिणीताई पवार,चैतन्य लोंढे,पालखी विठ्ठल मंदिर संस्थांचे अध्यक्ष तेजेंद्र कोंढरे, विश्वस्त प्रमोद बेंगरूट, शिवाजीराव जगदाळे, गोरख भिकुले आदी उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांनी आषाढीवारी निमित्त पालखीसोबत पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.