मंत्री नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर जहरी टीका केली आहे. ते म्हणाले, गद्दार कोण या विषयावर पुस्तक लिहिण्याची गरज आहे. सर्वात मोठा गद्दार म्हणजे संजय राऊत आहे. आज उद्धव ठाकरेंची जी अवस्था झाली आहे त्याला राऊत हेच जबाबदार आहे. राऊतने स्वतःला आरशात पहावं आणि मग आरोप करावे अशी टीका नितेश राणे यांनी केली.
राणे म्हणाले, मंत्री गुलाबराव पाटील जे बोलले ते योग्य बोलले, राजसाहेब जेव्हा बाहेर पडले तेव्हा याची गाडी कार्यकर्त्यांनी फोडली. राऊत हाच शकुनी मामा आहे अशी टीका नितेश राणे यांनी केली.
अबू आझमी यांना वारकरी संप्रदाय समजलेला नाही ते भेटल्यानंतर मी त्यांना समजावून सांगेन. वारी वर्षातून एकदा असते नमाज दिवसातून पाच वेळा असतो. नमाज अशा ठिकाणी पडला पाहिजे ज्या ठिकाणी लोकांना त्रास होऊ नये. वारी वर्षातून एकदा होते , वर्षातून एकदा निघालेल्या वारीमध्ये लाखो लोक जात असतात त्याला राज्य सरकारने पालखी मार्ग तयार केलेला आहे. अबू आजमी यांना भेटल्यानंतर वारकरी आणि वारी याबद्दल समजावून सांगेल असे हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
अबू आझमी आणि भाजप हे एका नाण्याची दोन बाजू आहेत,अबू आझमी ने एक पिल्लू सोडायचे आणि भाजपने हिंदू मुस्लिम भांडण लावायचे हे ठरलेलं आहे. अबू आझमी जे वक्तव्य करतोय ते भाजपच्या इशाऱ्यावर करतोय असा माझा स्पष्ट आरोप असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
अबू आझमी यांनी कोणाच्यातरी दबावातून असे वक्तव्य केले. वारकऱ्यांच्या वारी संदर्भात ते जे बोलले ते हिंदू-मुस्लिम मुद्दा पुन्हा उभा करण्यासाठी बोलले. त्याचा फायदा भाजपला होण्यासाठीच ते बोलले असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
वारकरी सांप्रदायाला शेकडो वर्षाची परंपरा आहे, शिस्तीचे प्रदर्शन वारकऱ्यांकडून होत असते, मात्र असे वादग्रस्त स्टेटमेंट करून मुस्लिमांकडून द्वेष केला जातो हे दाखवून दोन जाती तेढ निर्माण करण्याचा अबू आझमी चा प्रयत्न असतो. वारकरी आणि पालख्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत नाही, आणि वारकरी रस्त्यानी नाही तर काय हवेत उडून जाणार.असा सवाल करत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अबू आझमी यांचे थोबाड ठेचले पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे.
Gulabrao Patil : शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडला होता
शिवसेनेचे नेते शहाजी बापू पाटील यांनी म्हटले होते शिवसेना फुटली त्यावेळेस सर्वात आधी संजय राऊत फुटणार होते. मात्र त्यांना त्यावेळेस 35 ते 36 आमदारांनी विरोध केला. यावर मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारले असता ते म्हटले शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडला होता. मात्र ते त्यावेळेस थांबले, संजय राऊत सर्वात पहिले फुटणार होते अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.