Maharashtra Political Live updates Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics : पाच जुलैनंतर सगळी हवा निघेल, संजय राऊतांचा CM फडणवीसांना टोला

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...

Roshan More

विलास शिंदेंची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असलेल्या विलास शिंदे यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महानगरप्रमुखपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.

दिव्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बॅनरबाजी

ठाकरे बंधूना एकत्र पाहण्यासाठी 5 तारखेला सर्वांनी या, आपल्या मातीसाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी 5 जुलैच्या मोर्चा या, असे केले आवाहन करणारे बॅनर दिव्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने लावले आहे. एकनाथ शिंदेंच्या पक्षाने भाजपला पायघड्या घातल्या आहेत, त्यांना मराठी अस्मिता राहिली नाही. जर त्यांना खरंच मराठीची अस्मिता असेल, तर ते आंदोलनात येतील , असे उद्धव ठाकरेंचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे म्हणाले.

पाच जुलैनंतर सगळी हवा निघेल, फडणवीसांना संजय राऊतांचा टोला

हिंदी सक्तीचा अहवाल हा उद्धव ठाकरेंनी स्वीकारला होता, असे भाजप नेते सांगत आहेत. त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावत संजय राऊत यांनी ट्विट केले आहे की, यालाच म्हणतात! खोटं बोला पण रेटून बोला! हिंदी सक्ती प्रकरणात फडणवीस सरकारचीच हवा गेलीय! ५ तारखेच्या एकत्रीत मोर्चा नंतर पूर्ण हवा जाईल!

देशातील पहिला 'संविधान प्रास्ताविका पार्क'चे सरन्यायाशीधश गवई करणार उद्घाटन, CM फडणवीसांची प्रमुख उपस्थिती

देशातील पहिला 'संविधान प्रास्ताविका पार्क'उद्घाटना देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज सकाळी 11 वाजता उद्घाटन होणार आहे.नागपूर विद्यापीठाच्या 'डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉ'च्या परिसरात संविधान प्रास्ताविका पार्क उभारण्यात आले आहे. हा संविधान प्रास्ताविका पार्क सामान्य नागरिकांसाठी खुला राहणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT