Ajit Pawar-Laxman Hake Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Live Updates : अजित पवार यांच्यावर टीका करताना लक्ष्मण हाकेंची पुन्हा जीभ घसरली

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...

Pradeep Pendhare

Laxman Hake on Ajit Pawar : अजित पवार यांच्यावर टीका करताना लक्ष्मण हाकेंची पुन्हा जीभ घसरली

ओबीसी (OBC) आरक्षणाच्या बचावासाठी लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर शिवराळ भाषेत टीका करताना जीभ घसरली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूरज चव्हाण यांनी लक्ष्मण हाके यांना महाराष्ट्रात फिरू देणार नसल्याचा इशारा दिला आहे. तर अजित पवारांच्या समर्थकाने लक्ष्मण हाकेंना थेट कायदेशीर नोटीस बजावली. आता या नोटीसीला प्रत्युत्तर देताना लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केलाय. लक्ष्मण हाके यांनी अजित पवार यांना 'दरोडेखोर' म्हटले आहे.

Sanjay Raut ShivsenaUBT : ऑगस्टपर्यंत राज्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी; खासदार राऊतांचे संकेत

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यापेक्षा दिल्ली जास्त मला माहिती आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या कामाची पद्धत मला माहिती नाही. हा एक इशारा आहे. याच्यापेक्षा वेगळ्या घडामोडी ऑगस्टच्या अंतापर्यंत घडतील, असे मला संकेत आहेत. त्यामुळे या राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले.

Sanjay Raut : ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी केंद्रीय यंत्रणा मैदानात; राऊत म्हणाले, "ते अनेक गोष्टी करणार"

"उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे हे राजकीय दृष्ट्या एकत्र येऊ नये, यासाठी केंद्रीय स्तरावर आणि महाराष्ट्रात प्रयत्न सुरू झाले आहेत का? असे विचारले असता संजय राऊत म्हणाले की, ते प्रयत्न करतील, ते व्यूहरचना करतील, ते दबाव आणतील, अनेक गोष्टी ते करतील. हा त्यांचा राजकारणाचा भाग आहे. पण, लोकं उत्स्फूर्तपणे बाहेर येत आहेत", असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला.

Jitendra Awhad Vs Gopichand Padalkar : आव्हाडांची पडळकरांना पाहताच, मंगळसूत्र चोरांचा... मंगळसूत्र चोरांचा, अशी घोषणाबाजी

Jitendra Awhad

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आज भाजप (BJP) आमदार गोपीचंद पडळकर यांना समोरा-समोर भिडले. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर काही दिवसांपूर्वी खालच्या पातळीवर टीका केली होती. विधानभवनात आव्हाड आणि पडळकर समोरासमोर येताच, आव्हाडांनी मंगळसूत्र चोराचा... मंगळसूत्र चोराचा.., अशी घोषणाबाजी पडळकर यांचे नाव टाळून केली. आव्हाडांच्या या घोषणाबाजीमुळे विधानभवन परिसरातील वातावरणात एकच चर्चा होती.

Tanaji Sawant : आमदार सावंत मतदारसंघात फिरकलेच नाही; राजीनाम्याची मागणी

सोलापूर जिल्ह्यातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) विधानसभेच्या निकालानंतर मतदारसंघात फिरकले नसल्याची चर्चा आहे. त्यांच्या अनुपस्थितीवरून विरोधकांकडून टीका होत आहे. Sawant यांच्या कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांची Angioplasty झाली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात Sawant सहभागी होणार असल्याचेही कळते. एका अज्ञात व्यक्तीने मागणी केली आहे की, "तुम्ही मतदार संघातल्या विकासासाठी, लोकांसाठी या ठिकाणी काम करू शकत नसाल तर तुम्ही या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे."

Gujarat Bridge Collapse : गुजरातच्या बडोदा पूल दुर्घटनेतील मृतांची संख्या 17 वर पोचली

गुजरातमधील (Gujarat) बडोदा जिल्ह्यातील महिसागर नदीवरील पूल कोसळण्याच्या दुर्घटनेतील मृतांची संख्या 17 झाली आहे. बडोदा इथल्या पाड्रा शहराजवळील गंभीरा गावाजवळ आनंद आणि बडोदा जिल्ह्यांच्या जोडणाऱ्या चार दशके जुना पुलाचा काही भाग कोसळला होता.

Sanjay Raut Vs Shivsena : एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांवर भविष्यात केंद्रीय यंत्रणेची कारवाई होणार; खासदार संजय राऊत यांचा दावा

Eknath shinde & Sanjay Raut

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या जवळील नेत्यांवर भविष्यात कारवाई होणार असल्याचे निश्चित झाले आहे. केंद्रीय तपास यंत्रणा त्यानुसार कार्यवाही सुरू आहे. ऑगस्टच्या अंतापर्यंत या घडामोडी घडतील, असे संकेत आहे. राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी होताना भविष्यात दिसेल. दिल्लीतील सत्तेच्या संरक्षण त्यांना तात्पुरते आहे. ती शक्ती कमजोर झाली आहे. एखादा दुसरा नेता वगळता इतर कोणी नेता सत्तेतील एकनाथ शिंदे यांना संरक्षण देत असेल, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला.

Radhakrishna Vikhepatil : निळवंडे प्रकल्पासाठी 5 हजार कोटी; मंत्री विखे पाटलांची माहिती

निळवंडे प्रकल्पांच्या उर्वरित कामांकरिता केंद्र सरकारच्या केंद्रीय जल आयोगाच्या तांत्रिक सल्लागार समितीने 5 हजार 23 कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhepatil) यांनी दिली. जल आयोगाच्या तांत्रिक सल्लागार समितीची 159 वी बैठक केंद्रीय जलसंसाधन मंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली झाली.

Jagdeep Dhankhar : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे सेवानिवृत्तीचे संकेत

उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात निवृत्तीवर भाष्य केले आहे. ईश्वराची कृपा राहिली, तर ऑगस्ट 2027 मध्ये सेवानिवृत्त होईल, असे वक्तव्य उपराष्ट्रपती धनखड यांनी म्हटले. धनखड यांचा 14 वे उपराष्ट्रपती म्हणून असलेला कार्यकाळ 10 ऑगस्ट 2027 रोजी संपणार आहे.

Param Bir Singh : पाच कोटी खंडणी अन् जातीवाचक प्रकरणात परमबीर सिंह यांची निर्दोष मुक्तता

मुंबईचे (Mumbai) पोलिस आयुक्त परमबीर सिंह, सुनील जैन आणि संजय पुनामिया यांच्यासह पाच जणांविरोधात सुमारे पाच कोटी रुपयांची खंडणी उकळल्याच्या आरोपाखाली ठाण्यातील कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता, तर जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली कल्याणच्या बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या दोन्ही प्रकरणांच्या तपासात काहीच तथ्य आढळले नाही, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने परमबीर यांची निर्दोष मुक्तता केली असून, तसा अहवाल न्यायालयात सादर केला आहे.

Maharashtra Election Commission : स्थानिक स्वराज्यसाठी 1 जुलैपर्यंतची मतदार यादी पात्र

maharashtra election commission

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 1 जुलैपर्यंत ज्यांची मतदार (Voter) यादीत नावे आहेत, त्यांना मतदान करता येईल. त्यानुसार 1 जुलैची अंतिम केलेली मतदार संख्या, मतदार यंत्र आणि उपलब्ध मनुष्यबळाचा विचार करून निवडणुकीचे नियोजन करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT