Shambhuraj Desai Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra politics : सत्यजितसिंह पाटणकर यांच्या भाजप प्रवेशाने शंभूराज देसाई नाराज

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...

Sachin Waghmare

Mahayuti News : महायुतीमधील घटकपक्षांमध्ये इनकमिंग वाढले

महायुतीची सत्ता आल्यानंतर विरोधी पक्षातून महायुतीमधील घटकपक्षांमध्ये इनकमिंग वाढलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांचे कट्टर विरोधक सत्यजितसिंह पाटणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे सांगली जिल्ह्यात वैभव पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांचे ते प्रतिस्पर्धी आहेत. सत्यजितसिंह पाटणकर यांनी अपक्ष विधानसभा निवडणूक लढवली होती. सत्यजीत पाटणकर यांच्या भाजप प्रवेशवर शंभूराज देसाई हे नाराज असल्याचं समोर आलं आहे.

Uddhav-Raj thackeray : ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीला फटका बसण्याची शक्यता !

ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरु असताना महायुतीच्या गोटातून महत्त्वाची बातमी येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे ब्रँड धोक्यात आलेला आहे. ठाकरे ब्रँड टिकवण्यासाठी दोन्ही बंधू सोबत येऊ शकतात. तशी चर्चा गेल्या दीड महिन्यांपासून सुरु आहे. त्यामुळे मुंबईत ठाकरेंचा मुकाबला करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी कंबर कसली आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यास त्याचा सर्वाधिक परिणाम मुंबईत दिसू शकतो. त्यामुळे महायुती मुंबई महापालिकेत सोबत लढण्याची शक्यता आहे. मत विभाजन टाळण्यासाठी महायुती मुंबईत एकत्र लढू शकते.

Narayan rane : राणेंनी पुन्हा एकदा प्रकाश महाजन यांना डिवचले

भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मनसेचे नेते प्रकाश महाजन यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. प्रकाश महाजन यांनी मंत्री नितेश राणे यांची उंची काढल्यानंतर नारायण राणे यांनी महाजन यांची औकात काढली. त्यानंतर प्रकाश महाजन यांनी छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात थेट आंदोलन करत नारायण राणेंविरोधात दंडही थोपाटले. त्यानंतर आता नारायण राणे यांनी पुन्हा एकदा प्रकाश महाजन यांना डिवचले आहे. कोण आहे हा मेंटल प्रकाश महाजन? असा सवालच राणेंनी केला आहे. त्यामुळे राणे आणि महाजन वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खासदार नारायण राणे बुधवारी धाराशिवला आले होते. राणेंनी सहकुटुंब आई तुळजा भवानीचे दर्शन घेऊन देवीला कमळाचं फूल अर्पण केले. त्यानंतर महाजन यांच्यावर टीका केली.

////////

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT