शक्तिपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा (Farmer) विरोध होत असला, तरी दुसरीकडे शेतकऱ्यांचा एक गट या शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनात असल्याचं समोर आलं आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी सीमांकन मोजणीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना विरोध केला. तर दुसरीकडे याच हदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी सीमांकन मोजणीचे भूमिपूजन केले आणि शक्तिपीठ महामार्गाला कुठलाही विरोध नसल्याची भूमिका सांगितली. यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये दोन गट पडल्याच समोर आला आहे.
सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी रस्त्यावर उतरत शक्तिपीठ महामार्गास विरोध केला. जिल्हाधिकारी यांनी जमावबंदीचा देश लागू केला होता. तरी देखील आंदोलन केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याचा ठपका ठेवत खासदार विशाल पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगली ग्रामीण पोलिसांनी खासदार विशाल पाटील यांच्यासह 50 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.
अंबरनाथमध्ये मनसैनिकांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्रित फोटो असलेले टी-शर्ट छापले आहेत. 5 जुलैला विजयी मेळाव्यात मनसैनिक (MNS) हे टी-शर्ट घालून सहभागी होणार आहेत. मनसे नेते अविनाश जाधव यांनी 5 जुलैला दोन्ही ठाकरे बंधू नक्की एकत्र येतील आणि महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल, असं म्हणत या मनसैनिकांचं कौतुक केलं.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप मंत्री आशिष शेलार यांच्यावर जोरदार टीका केली. पाच जुलैच्या विजयी मेळाव्याची तयारी सुरू असून, ठाकरे एकच आहे, असा सूचक इशारा त्यांनी दिला. आशिष शेलार यांना काय म्हणाचे ते म्हणून द्या. हा मोर्चा होता सगळ्यांचा होता, म्हणून तुम्ही माघार घेतली. तुम्ही वेगळे करण्याचा प्रयत्न करता आहात. ही तुमच्या मनातली भीती आहे. गर्दी काय असते हे दोन्ही ठाकरेंनी वेळोवेळी दाखवले आहे. भाजप पैसे देऊन माणसं आणण्याची परंपरा सुरू केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पैसा, दहशत, सीबीआय, ईडी दाखवून मोडल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला.
सांगली इथं ख्रिश्चन धर्मगुरूंविरोधात अपमानास्पद आणि हिंसक विधान करणाऱ्या भाजप (BJP) आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्यांच्या आमदारकीवर कारवाई करावी, या मागणीसाठी थेट बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या आवारात ख्रिस्ती समाजाकडून ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. "आमदारकी रद्द झालीच पाहिजे", "घृणा पसरवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा" अशा घोषणा गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात ख्रिस्ती समाजाकडून देण्यात येत आहेत. दरम्यान,जोपर्यंत गोपीचंद पडळकर विरोधात गुन्हा दाखल केला जातं नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा ख्रिस्ती समाजाकडून देण्यात आला आहे.
शिक्षक रागावल्याच्या कारणावरून बुलढाणा जिल्ह्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे सरकारला जाब विचारला आहे. शाळांमधील मुलं, त्यांचे पालक आणि शिक्षकांना समुपदेशनासाठी काय उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत, याची माहिती विचारली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.