Rupali Chakankar Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Live Updates : वैष्णवी हगवणे प्रकरणी राज्य महिला आयोगाने स्वतः सुमोटो दाखल करत या प्रकरणाला वाचा फोडली

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर..

सरकारनामा ब्यूरो

वैष्णवी हगवणे प्रकरणात चाकणकरांचं मोठं विधान

वैष्णवी हगवणे यांच्याबाबत घडलेल्या दुर्दैवी घटनेत राज्य महिला आयोग कुठलीही तक्रार प्राप्त झालेली नसताना देखील आयोगाने स्वतः सुमोटो दाखल करत या प्रकरणाला वाचा फोडली आहे,तर मयुरी हगवणे यांच्यासाठी तक्रारदार भाऊ मेघराज जगताप यांच्या कडून ६ नोव्हेंबर २०२४ रोजी तक्रार प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने २४ तासांच्या आत संबंधित अर्जाची दखल घेत पौड पोलीस स्टेशनला कारवाईचे आदेश देत अहवाल सादर करण्यास सांगितले होते. असं रुपाली चाकणकरांनी म्हटलं आहे.

America Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय, देशावरील कर्जाचा बोजा वाढण्याची शक्यता; 8.30 लाखांहून अधिक नोकऱ्या संपणार

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक नवा प्रस्ताव ठेवला आहे. One Big Beautiful Bill Act आणणार आहेत. या विधेयकाची चर्चा फक्त अमेरिकेत नसून संपूर्ण जगभर आहे. हे बिल अमेरिकेच्या 2017 च्या कर कपातीला कायम करण्यासाठीचा प्रयत्न आहे. हे विधेयक व्यापक स्वरुपात असून ज्यामध्ये सीमा सुरक्षा, खर्च आणि कराचा समावेश आहे. या विधेयकासंदर्भात काही रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की यामुळं अमेरिकेवरील कर्ज वाढेल. अमेरिकेवर 3.8 ट्रिलियन डॉलर कर्ज वाढू शकते. याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊन 8.30 लाखांहून अधिक नोकऱ्या संपतील, अशी शक्यता आहे.

PM Vishwakrma Yojana : ‘प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना’ला गती; 7 हजार 632 कारागिरांना प्रशिक्षण, 504 जणांना बँक कर्ज वितरित

PM Vishwakrma Yojana

भारत सरकारच्या ‘प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजने’ला अहिल्यानगर जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 7 हजार 632 पारंपरिक कारागिरांना 15 प्रशिक्षण केंद्रांमार्फत प्रशिक्षण देण्यात आले आहे. यापैकी 504 कारागिरांना बँकांमार्फत कर्ज वितरित करण्यात आले असून उर्वरित लाभार्थ्यांच्या कर्ज प्रक्रियेस गती देण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी बाळासाहेब मुंडे यांनी दिली.

NCP Vs BJP vidhansabha : विधानसभा निडवणुकीत पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न केला; राष्ट्रवादीच्या नेत्याचा गौप्यस्फोट

मला यंदाच्या विधानसभा निडवणुकीत पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न केला होता, असा गौप्यस्फोटच माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केला आहे. नागपूर येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विदर्भस्तरीय मेळाव्यात ते बोलत होते. विशेष म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आता आपण ताकद दाखवून देऊ असे म्हणत त्यांनी एकप्रकारे 'एकला चलो रे'चे संकेत दिले आहेत..

Ahilyanagar Soldier Sandeep Gaiker : अहिल्यानगरच्या सुपुत्राला जम्मू काश्मीरमध्ये वीरमरण; उद्या लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय सैन्य दलातील संदीप पांडुरंग गायकर या जवानाला वीरमरण आलं आहे. संदीप गायकर अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा गावचे भूमिपुत्र होते. या घटनेनं ब्राम्हणवाडा गावासह जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. या घटनेमुळं ब्राम्हणवाडा गाव आज आणि उद्या पूर्णतः बंद ठेवण्यात आलं आहे. गावातील ज्या सह्याद्री विद्यालयात संदीप यांनी शिक्षण घेतलं, त्याच विद्यालयाच्या प्रांगणात उद्या त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Election Commission of India : निवडणूक आयोगाचे दोन महत्त्वापूर्ण निर्णय; केंद्राबाहेर मोबाईल ठेवण्याचा सुविधा देणार

मतदारांच्या सोयीसाठी आणि मतदान दिवशीच्या व्यवस्थापनात सुधारणा करण्याच्या उद्देशाने, भारत निवडणूक आयोगाने दोन महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केले आहेत. त्यानुसार, मतदान केंद्राच्या बाहेर मोबाईल ठेवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असून, प्रचारासाठीची मर्यादा देखील नव्याने निश्चित करण्यात आली आहे. हे निर्णय लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 आणि निवडणूक आचारसंहिता 1961 यांच्याशी सुसंगत आहेत.

Karuna Sharma Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्यावा; करुणा मुंडे यांची मागणी

रुपाली चाकणकर म्हणतात, 35 हजार 971 महिलांच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. मात्र, त्यातील किती महिलांना तुम्ही न्याय मिळवून दिलाय? मी देखील 6-6 तक्रारी दिल्या होत्या. त्या तक्रारी तुम्ही पोलिसांकडे ढकलतात. तुम्ही त्याबद्दल विचारपूस करत नाही की हे प्रकरण तडीस गेलं का? किती महिलांना न्याय मिळाला? त्याच्यामुळे महिलांवरील अत्याचार वाढत चालले आहेत", असं म्हणत करुणा शर्मा यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकरणकर यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली आहे.

RBI Modi government News : RBI कडून 2.68 लाख कोटी रुपयांचा लाभांश जाहीर

मोदी सरकारला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून 2.68 लाख कोटी रुपयांचा लाभांश जाहीर करण्यात आला आहे. गेल्या वर्षी मध्यवर्ती बँकेकडून केंद्राला 2.1 लाख कोटी रुपयांचा विक्रमी लाभांश दिला होता. रुपया स्थिर ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून मोठ्या प्रमाणात अमेरिकन डॉलर्सची विक्री केली आहे. तसेच लिक्विडीटी ऑपरेशन्स अंतर्गत बँकांना मोठ्या प्रमाणात निधी दिल्यानंतर त्याबदल्यात व्याजाच्या स्वरुपात आरबीआयला नफा झाला आहे.

BJP women agiation rajendra hagwane : हगवणे पिता-पुत्राविरोधात भाजप महिला आघाडी आक्रमक; अंगावर टोमॅटो फेकली

पुणे जिल्ह्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी आणि छळ प्रकरणी राज्यात संतापाची लाट उसळली आहे. राजेंद्र हगवणे व त्याचा मुलगा शशांक हगवणे याला शिवाजीनगर न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तत्पूर्वीच, दुपारी भाजप महिला आघाडीने न्यायालय परिसरात धाव घेत हगवणेंच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी हगवणे पिता-पुत्राच्या अंगावर टोमॅटो फेकण्यात आली.

Mumbai : मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा

मुंबईसाठी हवामान खात्याकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. समुद्राला आलेल्या भरतीमुळे आज संध्याकाळी दहा वाजता समुद्रात 5 ते 6 मिटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत, कोणीही समुद्राच्या जवळ जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.

Rajendra Hagavane : राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना 28 मे पर्यंत पोलीस कोठडी

वैष्णवी हगवणे प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वैष्णवी मृत्यू प्रकरणात ही कोठडी सुनावण्यात आली आहे. शिवाजीनगर कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

मला पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न केले : धर्मराव बाबा अत्राम

राष्ट्रवादीचे धर्मराव बाबा अत्राम यांनी थेट भाजपवर हल्लाबोल केला आहे. मला यंदाच्या विधानसभा निवणुकीत पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न केला होता, असा आरोप त्यांनी केला आहे. नागपूर येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विदर्भस्तरीय मेळाव्यात ते बोलत होते. विशेष म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आता आपण ताकद दाखवून देऊ असे म्हणत त्यांनी एकप्रकारे एकला चलो रे चे संकेत दिले आहेत.

Anil Gote : एसआयटी म्हणजे फक्त डोळ्यात धुळफेक

धुळे कॅश प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. माजी आमदार अनिल गोटे यांनी माझा चौकशी समितीवर विश्वास नसल्याचे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मंत्री जयकुमार रावल यांनी चेतक फेस्टिवल व बॉम्बे फेस्टिवलमध्ये 390 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. या लोकांना भ्रष्टाचारी मंत्री आपल्या मंत्रिमंडळात हवे आहेत. म्हणून एसआयटी म्हणजे फक्त डोळ्यात धुळफेक आहे, असा आरोप अनिल गोटे यांनी केला आहे. तर आमदारांच्या समित्या म्हणजे पैसे गोळा करण्याच्या समित्या असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

IMD Monsoon Update : यंदा मान्सून वेळेआधीच केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, यंदा मान्सून वेळेआधीच केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. विभागानं सांगितलं आहे की, सध्या हवामान मान्सूनसाठी पोषक होत चाललं असून, 25 मेच्या आसपास मान्सून केरळच्या किनारपट्टीवर दाखल होऊ शकतो.

मागील वर्षी मान्सूनने 30 मे रोजी केरळमध्ये एन्ट्री केली होती. मात्र यंदा तो तब्बल पाच दिवस आधी पोहचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, 2009 नंतर प्रथमच मान्सून इतक्या लवकर केरळमध्ये दाखल होणार आहे.

कितीही मशाली पेटवल्या तरी त्यांच्या हृदयात कायम घड्याळ

के. पी. पाटील यांनी कितीही मशाली पेटवल्या तरी त्यांच्या हृदयात कायम घड्याळ राहिलं आहे. घरातला माणूस काही दिवस घराच्या बाहेर राहिले पण हा माणूस पुन्हा घरात आला की जो आनंद होतो तसाच आनंद आज झाला आहे, असे म्हणत अजित पवार यांनी माजी आमदार के.पी पाटील यांच राष्ट्रवादी पक्षात स्वागत केले.

राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे शिवाजीनगर कोर्टात

राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना शिवाजीनगर कोर्टात आणण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर कोर्टाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

फक्त टाईट कपडे घालून चालणार नाही, प्रफुल पटेलांक़डून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची कानउघडणी

नागपूर : राज्यात आपण सत्तेवर आहोत. विदर्भातून सहा आमदार निवडूण आले आहे. यानंतरही पक्ष वाढत नाही याला जबाबदार कोण? अशी विचारणा करत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष, खासदार प्रफुल पटेल यांनी विदर्भातील पदाधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले.

फक्त टाईट कपडे घालून फिरता असे चालणार नाही. कोणी किती क्रियाशिल सदस्यांची नोंदणी केली याची आकडेवारी आपल्याकडे आहे. तुम्हाला जिल्ह्यात 10 लोकं सापडत नसतील आणि पक्षाचे बेसिक कामही करत नसला तर पक्ष कसा वाढणार? तुमच्या निष्ठेवर कसा विश्वास ठेवायचा अशी विचारणा त्यांनी जाहीरपणे केली.

खासदार सुप्रिया सुळेंची मोठी घोषणा; हुंडामुक्त महाराष्ट्रासाठी राज्यव्यापी लढा उभारणार 

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी हुंडामुक्त महाराष्ट्रासाठी राज्यव्यापी लढ्याचा निर्धार व्यक्त केला आहे. "महाराष्ट्राची लेक स्व. वैष्णवी कस्पटे - हगवणे हिचा अतिशय वेदनादायक पद्धतीने हुंडाबळी झाला ही घटना मनाला प्रचंड वेदना देणारी घटना आहे. ज्या राज्याने स्त्री-मुक्तीच्या दृष्टीने देशाला दिशा दाखविण्याचे काम केले तेथे वैष्णवीसारख्या लेकीचा बळी जाणे हे अतिशय संतापजनक आहे. पण केवळ संताप आणि दुःख व्यक्त करून भागणार नाही, तर जोरदारपणे कृतिशील जागृतीचे पाऊल उचलावे लागेल, असेही सुळे यांनी म्हटलं.

वैष्णवीच्या आई-वडिलांची हगवणे कुटुंबावर मकोका लावण्याची मागणी; CM फडणवीस म्हणाले...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा माजी पदाधिकारी राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून त्यांची सून वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील सर्वच आरोपींना अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मकोका लावण्याकरता काही नियम आहेत. त्या नियमात बसले तर हगवणे कुटुंबावरही मकोका लागू शकेल. पण, ते त्या नियमांत बसतात की नाही, याविषयी आजकाही सांगता येणार नाही, असं म्हटलं आहे.

वैष्णवीच्या सासरे अन् दिराला बेड्या; भाजपच्या चित्रा वाघ यांची CM फडणवीसांकडे केली मोठी मागणी

वैष्णवी हगवणेचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांच्या अटकेनंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मोठी मागणी केली आहे. वाघ म्हणाल्या, क्रुरकर्मा हरामखोरांना मरेपर्यंत फाशी द्या. तसेच या प्रकरणात सरकारकडून चांगले वकील उभे राहतील फास्टट्रॅकवर हे प्रकरण चालेल. हगवणे कुटुंबाला असा धडा शिकवला जाईल की पुन्हा कोणी लेकी-बाळीला हात लावायचा विचार करणार नाही, असंही त्यांनी म्हटलं.

...पण मी भाजपचा मंत्री नाही! राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांचं मोठं विधान

छगन भुजबळ मंत्री कोणामुळे झाले याबाबत वेगवेगळे दावे केले जात आहे. याबाबत मंत्री छगन भुजबळ म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्यासाठी आग्रही होते हे खरे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीसुद्धा प्रयत्न केले. असे असले तरी मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून मंत्री झालो आहे. मी भाजपचा मंत्री नाही, असे स्पष्ट करून त्यांनी टीका करणाऱ्यालाही उत्तर दिले.

हवामान विभागाकडून मोठी अपडेट!  कोकण,मराठवाड्यासह विदर्भातही मुसळधार पावसाची शक्यता 

भारतीय हवामान विभागाकडून शुक्रवारी(ता. 23 मे) महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा तसेच आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

फडणवीसांकडून शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज

शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुड न्यूज दिली आहे. आता शेतरस्त्याची किमान रुंदी ३ मीटर असणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. प्रत्येक शेतरस्ताप्रकरणाचा निर्णय ९० दिवसांत देणं बंधनकारक आहे, शेतरस्त्याची नोंद आता ७/१२ च्या ‘इतर हक्कां’मध्येच होणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

सहा जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरूपी बंद करा: भिडे गुरुजी 

Kolhapur News: सहा जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरूपी बरखास्त करायला पाहिजे, असे मत संभाजी भिडे गुरुजी यांनी व्यक्त केले आहे. ते कोल्हापुरात बोलत होते. शिवराज्याभिषेक सोहळ्याचा राजकारणासाठी वापर होत आहे. तिथीप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व कार्यक्रम पार पडले पाहिजेत, असे ते म्हणाले. रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढायला नको, या कुत्र्याचं राजकारण करू नका. वाघ्या कुत्र्याबद्दल जे इतिहास संशोधक बोलतात ते कोणत्या उंचीचे आहेत, हे तपासले पाहिजे, असे भिडे म्हणाले. याबाबत एक स्वतंत्र इतिहास संशोधक मंडळ स्थापन करून त्याबाबत निर्णय घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली.

 

राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना वैष्णली हगवणे मृत्यू प्रकरणी सातव्या दिवशी पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांना आज (गुरुवार) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास एक सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलगी आणि सून यात फरक करणाऱ्यांना इशारा दिला आहे.

हगवणे बाप-लेक फरार असताना कोल्हापूर, पवनानगर ,तळेगाव, स्वारगेट परिसरात

वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे फरार असताना पवनानगर ,तळेगाव ,स्वारगेट परिसरात फिरत होते, याबाबतचे सीसीटीव्हीचे फुटेच पोलिसांच्या हाती लागले आहे. राजेंद्र हगवणे व सुशील हगवणे बावधनच्या मुहूर्त लॉन्स ,कोल्हापूर, पवनानगर ,तळेगाव ,स्वारगेट या भागात फिरत असल्याचे आढळले आहे.

हगवणे पिता पुत्रांना राजकीय पाठबळ - सुषमा अंधारे

वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी राजेंद्र हगवणे आणि त्यांचे पुत्र सुशील हगवणे यांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांना अटक केली की त्यांची स्वतः होऊन सरेंडर केले हे स्पष्ट होऊ शकले नाही. त्यांनी जर सरेंडर केले असेल तर त्यांना राजकीय पाठबण आहे, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे.

राजेंद्र हगवणेंना दुपारी दोनला कोर्टात हजर करणार

बावधन पोलिसांनी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला अटक केल्यानंतर स्टेशन डायरी नोंद केली. राजेंद्र हगवणे व सुशील हगवणे ला शिवाजीनगर कोर्टात दुपारी दोन वाजता हजर करण्यात येणार आहे. राजेंद्र व सुशील ला कोणी मदत केली. ते कुठल्या ठिकाणी लपून बसले होते त्याचा शोध घ्यायचा आहे अशी अनेक कारणावर पोलिस मागणार रिमांड मागणार आहेत.

धुळे कॅश प्रकरणात कक्ष अधिकारी किशोर पाटील निलंबित

धुळे कॅश प्रकरणात एसआयटी नेमण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणात कक्ष अधिकारी किशोर पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे. किशोर पाटील यांच्या नावाने विश्रामगृहातील खोली बूक होती. या खोलीमध्ये तब्बल एक कोटी 84 लाखांची रोकड सापडली आहे.

Vaishnavi Hagawane Death : वैष्णवी मृत्यू प्रकरणी राजेंद्र हगवणे अन् सुशील हगवणेंना अटक

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना आज (शुक्रवार) पहाटे पहाटे 4.30 वाजता पोलिसांकडून अटक करण्यात आली.सात दिवसांपासून राजेंद्र आणि सुशील फरार होते. मिळालेाल्या माहिनुसार हे दोघे स्वतःहून पोलिसांच्या समोर हजर झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT