ठाकरे बंधूंनी आयोजित केलेल्या विजयी मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अजित नवले, शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांची उपस्थिती होती. याशिवाय मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. भालचंद्र मुणगेकर, तेजस्विनी पंडित, सिद्धार्थ जाधव, महेश मांजरेकर आदी कलाकारही उपस्थित होते. मात्र काँग्रेसचा एकही नेता किंवा आमदार, खासदार या मेळाव्याला उपस्थित राहिले नाहीत.
मेळाव्याच्या शेवटी व्यासपीठावर अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचेही एकत्र आगमन झाले. दोघांनीही एकमेकांना अलिंगन देत उपस्थित जनसमुदायाला अभिवादन केले.
एक गद्दार का 'जय गुजरात' असं म्हणाला, अरे किती लाचारी करायची? हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा पाईक असू शकतो का? अशा भाषेत एकनाथ शिंदे यांच्या 'जय गुजरात' वर उद्धव ठाकरेंनी टीका केली.
हिंदीची सक्ती तुमच्या सात पिढ्या आल्या तरी लावू देत नाही, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे.
आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्वाचं आहे. आमच्यातील अंतरपाट अणाजीपंतांनी दूर केला आहे. आता अक्षतांची गरज नाही. आता एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच युतीचा उघड संदेश दिला.
महाराष्ट्राकडे आणि मराठीकडे वाकड्या नजरेने पाहू नका. आम्ही शांत आहोत, म्हणजे गांडू नाही. अशा भाषेत राज ठाकरे यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला.
मी आणि उद्धव ठाकरे जवळपास 20 वर्षांनंतर एकत्र एका व्यासपीठावर येत आहोत. जी गोष्ट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीस यांना जमलं, असा उपरोधिक टोला राज ठाकरे यांनी लगावला.
विजय मेळाव्याच्या व्यासपीठावर केवळ दोन खुर्च्या ठेवण्यात आल्या आहेत. मेळाव्यावर केवळ राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचीच छाप राहील याची काळजी घेण्यात येत आहे.
उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय वरळी डोममध्ये दाखल झाले आहेत. अनिल परब, बाळा नांदगावकर यांनी त्यांचे स्वागत केले.
मराठी माणसाच्या उत्साहाला आजच्या विजयी मेळाव्याने उधाण आलेच आहे. जणू स्वर्गातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या मराठी जनांना 'चलो वरळी'चे आवाहन करीत आहेत, असे सामना अग्रलेखात म्हंटले आहे.
विजयी मेळावा स्थळी अमित ठाकरे यांनी स्वतः ड्राईव्ह करत राज ठाकरे आणि कुटुंबियांना घेऊन दाखल झाले.
विजय मेळाव्याला वरळी डोममध्ये प्रचंड गर्दी जमली आहे. कार्यकर्त्यांना रोखणे पोलिसांना कठीण झाले आहे. कार्यकर्ते गेट तोडून आतमध्ये गेले आहेत.
हिंदी सक्तीविरोधातील ठाकरे बंधूंनी आयोजित केलेला विजय मेळावा आज संपन्न होत आहे. वरळी डोममध्ये बाराच्या सुमारास या विजय मेळाव्याला सुरुवात होणार आहे. मेळाव्याला अभूतपूर्व गर्दी होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.