Pune Crime News Sarkarnama
महाराष्ट्र

Hingoli Firing Video : धक्कादायक! पोलिस दलातील जवानाचा कुटुंबावर गोळीबार, पत्नी जागीच ठार तर दीड वर्षांचा चिमुकला...

SRPF Policeman Firing Hingoli : हिंगोलीमध्ये राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानाने आपल्या संपूर्ण कुटुंबावर अंदाधुंद गोळीबार केला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Roshan More

SRPF Policeman Firing : हिंगोलीमध्ये राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानाने आपल्या संपूर्ण कुटुंबावर अंदाधुंद गोळीबार केला. गोळीबार करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची पत्नी जागीच ठार झाली तर दीड वर्षाचा चिमुकला सासू गंभीर जखमी झाली आहे.

या घटनेनंतर आरोपी पोलिस कर्मचाऱ्याने पळ काढला असून पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. विलास मुकाडे असे गोळीबार करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपीच्या पत्नीचे शव पोस्टपार्टमसाठी पाठवले आहे. तर, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे हिंगोली शहरात एकच खळबळ उडाली आहे.

आरोपी जवानाने आपल्याच कुटुंबावर गोळीबार का केला? याचे कारण अद्यापही समोर आले नाही. आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. त्याच्या अटकेनंतरच त्याने हा हल्ला का केला? हे समोर येईल. या प्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहेत.

सतीश वाघ हत्येप्रकरणी मोठी अपडेट

पुणे शहरात विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामा सतीश वाघ यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. या हत्येमागे सतीश वाघ यांची पत्नी मोहिी वाघ याच मुख्य सुत्रधार असल्याचे समोर आले आहे. त्यांनी आपल्या पतीच्या हत्येची सुपारी दिली असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे.

कल्याणमधील आरोपीला पत्नीच साथ

13 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून खून करणाऱ्या आरोपी विशाल गवळी याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी विशाल याला त्याची पत्नीने पुरावे नष्ट करण्यात मदत केली. पोलिसांनी आरोपी विशाल याच्यासह त्याच्या पत्नीलाही अटक केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT