IAS Devendra Singh Suspension .jpg Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra IAS News: पंकजा मुंडेंचे गंभीर आरोप, सभागृहातूनच निलंबनाचे आदेश, 'या' IAS अधिकाऱ्याबाबत सरकार लवकरच मोठा निर्णय घेणार

IAS Officer Suspended : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात थेट एका IAS अधिकाऱ्यावर निलंबनाचीच कारवाई करण्यात आल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनकाळात महाराष्ट्र विधानसभेच्या कामकाजादरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या प्रदूषण पातळीच्या मुद्दयांवरुन आयएएस अधिकारी एम. देवेंद्र सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

Deepak Kulkarni

Mumbai News: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात थेट एका IAS अधिकाऱ्यावर निलंबनाचीच कारवाई करण्यात आल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनकाळात महाराष्ट्र विधानसभेच्या कामकाजादरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या प्रदूषण पातळीच्या मुद्दयांवरुन आयएएस अधिकारी एम. देवेंद्र सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

यानंतर त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले होते. महायुती सरकारमधील मंत्री व भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव एम. देवेंद्र सिंग यांच्यावरील निलंबन कारवाईबाबतचा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित के

यावेळी त्यांनी सभागृहात माहिती देताना आयएएस (IAS) अधिकारी एम. देवेंद्र सिंग यांनी पुरावे सादर करत घडलेल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केल्याचं सांगितलं. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वकर यांनी सिंग यांच्यावरील निलंबन कारवाई मागे घेण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

याचदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणावर भाष्य केलं. ते म्हणाले,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव एम. देवेंद्र सिंग यांच्यावरील निलंबन कारवाई मागे घेतली जाईल. यामुळे देवेंद्र सिंग यांचा पुन्हा एकदा प्रशासकीय सेवेत परतण्याचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आहे.

राज्य विधिमंडळाच्या अधिवेशन काळातच वरिष्ठ दोन IAS अधिकाऱ्यांना निलंबीत करण्याचे आदेश तालिका अध्यक्ष दिलीप लांडे यांनी गुरुवारी दिले होते. त्याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली असून निलंबनाची फाईल्स पर्यावरण विभागाने मुख्यमंत्र्याकडे दिली होती. IAS अधिकारी एम देवेंद्र सिंग, सतीश पडवळ यांना निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहितीही समोर आली होती. मुख्यमंत्र्याकडे या संदर्भातील फाईल्स पर्यावरण विभागाने दिली आहे.

चंद्रपूरमधील आमदारानी पर्यावरणासंदर्भात सभागृहात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारला होता. त्याला त्यांना उत्तर देता आले नाही. मुंडे यांनी सभागृहात सांगितले की, अधिकाऱ्यांना याबाबत सांगितले होते. मात्र, त्यांनी ब्रिफींग दिले नाही. त्यांना वारंवार बोलवून देखील ते उपस्थित राहिले नाहीत.यानंतर सिंग यांच्यावर थेट निलंबनाची कठोर कारवाई करण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT