Shahrukh Khan- Aryan Khan
Shahrukh Khan- Aryan Khan  Sarkarnama
महाराष्ट्र

शाहरुख बोलला आणि मुलाने करुन दाखवलं

सरकारनामा ब्युरो

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानचे (Aryan Khan) नाव सध्या चर्चेत आहे. शनिवारी रात्री मुंबईहून (Mumbai) गोव्याला (Goa) जाणाऱ्या एका क्रूझवर आयोजित केलेल्या रेव्ह पार्टीत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) छापा टाकला. यावेळी त्याला एनसीबीने आर्यनला अटक केली. ड्रग्ज प्रकरणात आर्यनसह आखणी दोघांना न्यायालयाने २४ तासांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र या सर्व गदारोळात शाहरुख खानचा एक जुना व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामुळे शाहरुख बोलला आणि मुलाने करुन दाखवलं अशी चर्चा सध्या सुरु असल्याचे बोलले जात आहे.

1997 मध्ये शाहरुख खानने प्रसिद्ध अभिनेत्री सिमी ग्रेवालच्या (simi grewal) टॉक शोमध्ये मुलाखत दिली होती. या दरम्यान तो खूप मोकळेपणाने बोलला. या मुलाखतीत त्याची पत्नी गौरी खान ही देखील त्याच्यासोबत होती. या मुलाखतीचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. या मुलाखतीच्या काही दिवस आधीच आर्यनचा जन्म झाला होता. शाहरुखसोबतच्या संभाषणात सिमी ग्रेवालने तू आर्यनला कसे वाढवणार, असा प्रश्न विचारला होता.

या प्रश्नाला उत्तर देताना शाहरुखने म्हटले होते की, "मला माझ्या तरुणपणात मला खूप काही करायचे होते, पण तशा सुविधा नव्हत्या म्हणून मी त्या करु शकलो नाही, पण आर्यन ते सर्व करावे जे मी करु शकलो नाही. जेव्हा आर्यन 3-4 वर्षांचा होईल, तेव्हा मी त्याला सांगेन की तो मुलींच्या मागे जाऊ शकतो, ड्रग्स घेऊ शकतो, सेक्स करू शकतो. मी हे करू शकलो नाही हे त्याने करायला हवे. माझ्याबरोबर काम करणाऱ्या ज्या लोकांना मुली आहेत, त्यांनी माझ्याकडे येऊन आर्यनची तक्रार करावी, अशी माझी इच्छा आहे.'' असेही त्याने म्हटले होते.

शाहरुख आणि गौरी हे हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. दोघांनी 1991 मध्ये लव्ह मॅरेज केले होते. आर्यन हा शाहरुख आणि गौरी यांचे पहिले अपत्य आहे. आर्यन नंतर मुलगी सुहाना खानचा जन्म झाला. त्यानंतर अबराम खानचा जन्म झाला. शाहरुख खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो गेल्या 29 वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत काम करत आहे. १९८९ मध्ये 'फौजी' या मालिकेतून त्यांनी छोट्या पडद्यापासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर, 1992 मध्ये त्याने 'दीवाना' चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT