Chhagan Bhujbal, Devendra Fadnavis,
Chhagan Bhujbal, Devendra Fadnavis,  sarkarnama
महाराष्ट्र

भुजबळांच्या मध्यस्थीनंतर फडणवीस उपस्थित राहणार ; राजकीय रुसवा फुगवा शमला

सरकारनामा ब्युरो

नाशिक : नाशिक येथे होत असलेल्या मराठी साहित्य संमेलनात (Nashik Sahitya Sammelan) निमंत्रणावरुन राजकीय नाट्य पाहायला मिळाले ''सर्व राजकीय पक्षांना संमेलनात सहभागी करून घ्यावे,'' असे महापैार सतीश कुलकर्णी यांनी सांगितले होते.

''साहित्य संमेलनाच्या निमंत्रणाबाबत भाजप नेते आणि महापौरांची नाराजी दूर केली आहे,'' असे संमेलनाध्यक्ष छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याकडून कळवण्यात आले आहे.

संमेलनाला महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री भारती पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना साधे संमेलनाचे निमंत्रणही देण्यात आले नव्हते. संमेलनासाठी निधी देणाऱ्या भाजपच्या तिन्ही आमदारांचा निमंत्रण पत्रिकेत उल्लेखही नाही. भाजप नेत्यांना डावलल्याने महापौर सतीश कुलकर्णी नाराज झाले होते. त्यांनी साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता.

साहित्य संमेलनासाठी अखेर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आले आहे. फडणवीस यांच्यासोबतच महापौर सतीश कुलकर्णी यांनीही संमेलनाला येणार असल्याचे सांगितले आहे. पालकमंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी मध्यस्थी केली आहे. त्यांनी महापौर सतीश कुलकर्णी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस तसेच महापौर कुलकर्णी यांनी संमेलनाला येण्याचे मान्य केले आहे, असे भुजबळ यांनी सांगितले.

छगन भुजबळ यांनी महापौर सतीश कुलकर्णी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. महापौरांची नाराजी दूर झाल्याचा दावा पालकमंत्री भुजबळ यांनी केला आहे. मात्र महापौर कुलकर्णी आणि भाजप नेते फडणवीस संमेलनात सहभागी होतात का, हे शुक्रवारी समजेल. नाशिक महापालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे. महापालिकेनेही संमेलनासाठी 25 लाखांचा निधी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला ऑनलाईन हजेरी लावणार आहेत. राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार समारोप कार्यक्रमाला उपस्थितीत राहणार आहेत. संमेलनात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योग मंत्री सुभाष देसाई, विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे हजेरी लावणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT