ips transfer .jpg Sarkarnama
महाराष्ट्र

IPS Officers Transferred : मोठी बातमी! राज्यातील तीन वरिष्ठ IPS अधिकारी राज्याबाहेर, कारण काय?

PS Lakshmi Gautam Jay Kumar Dr Aarti Singh : मुंबईतील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना राज्याच्या बाहेर धाडण्यात आले आहे. ते 9 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रबाहेर असणार आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : मुंबईत कार्यरत असलेल्या तीन मोठ्या आयपीएस अधिकाऱ्यांची बदली राज्याबाहेर करण्यात आली आहे. या बदली मागचे कारण म्हणजे पाच राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुका. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखत निवडणुका निष्पक्ष पार पडाव्यात यासाठी हा निर्णय घेतला घेतल्याचे सांगितले जात आहे.

बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये गु्न्हे शाखेतील सहआयुक्त लक्ष्मी गौतम, सहआयुक्त जयकुमार आणि सहआयुक्त डाॅ आरती सिंग यांचा समावेश आहे.

काही राज्यातील निवडणुका या संवेदनशील आहेत. त्या दृष्टिने या बदल्या करण्यात आल्या आहेत. लक्ष्मी गौतम यांची बदली आसामध्ये करण्यात आली आहे. निवडणुकीच्या तयारीवर देखरेख ठेवण्यासाठी त्या 18 मार्च ते 9 एप्रिल या काळात त्या आसामध्ये असतील.

सर्वाधिक संवेदनशील समजल्या जाणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात निवडणूक होणार आहे. येथे जय कुमार यांची बदली करण्यात आली आहे. तर, गुप्तचर विभागाच्या प्रमुख डाॅ.आरती सिंग यांच्यावर केरळची जबाबदारी असणार आहे. सुरक्षा व्यवस्थेवर त्या लक्ष ठेवतील. 18 मार्च ते 9 एप्रिल या कालवधीत त्या केरळमध्ये असतील.

पुन्हा महाराष्ट्रात

अधिकाऱ्यांची बदली ही निवडणुकीच्या काळापुरते करण्यात येते. तेथील निवडणूका निष्पक्षपणे पार पडाव्यात, निवडणुकीच्या काळात मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी या बदल्या तात्पुरत्या स्वरुपात केलेल्या असतात. निवडणूक पार पडताच अधिकारी पुन्हा आपल्या मुळ राज्यात रुजू होतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT