Chandrakant Patil-Devendra Fadanvis
Chandrakant Patil-Devendra Fadanvis Sarkarnama
महाराष्ट्र

`फडणवीसांकडे यायचं, चहा पिऊन पाठिंबा घेऊन जायचा, असं होणार नाही`

जगदीश पानसरे

औरंगाबाद : काॅंग्रेसचे दिवंगत आमदार शरद रणपिसे यांच्या रिक्त जागेसाठी होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत ट्विस्ट आला आहे. एकीकडे काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. आमचा विजय निक्कीच होणार, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला आहे.

असे असतांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मात्र आम्ही लढू, चमत्कार घडवू, असे सांगत निवडणुक होणार की नाही? याबद्दलची उत्सूकता वाढवली आहे. प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीनंतर मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलतांना चंद्रकांत पाटील यांनी या पोटनिडवणुकी संदर्भात भाष्य केले.

पाटील म्हणाले, शरद रणपिसे यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे, मग काॅंग्रेसने रणपिसे यांच्या घरात उमेदवारी का दिली नाही? नेहमी सामाजिक संकेत पाळायचे आणि भाजपला पाठिंबा मागायचा हे चालणार नाही. राजीव सातव एक चांगला कार्यकर्ता होता, काॅंग्रेसचा होता म्हणून काय झाले? मग काॅंग्रेसने राज्यसभेच्या वेळीच प्रज्ञा सातव यांना उमेदवारी का दिली नाही?

तिकडे रजनी पाटील यांना पाठवले

प्रज्ञा सातव यांना राज्यसभेवर संधी न मिळाल्याने पक्षात प्रचंड नाराजी निर्माण झाली. तेव्हा प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली. पण हे नेहमी चालणार नाही, टाळी एका हाताने वाजणार नाही. देवेंद्रजींच्या घरी जायचे, चहा प्यायचा आणि पाठिंबा मिळवायचा हे यावेळी होणार नाही. आम्ही लढू आणि तुम्हाला चमत्कार घडलेला पहायला मिळेल, असा दावा देखील चंद्रकांत पाटील यांनी केला.

निवडणूक होणारच का, या प्रश्नावर मी असे म्हणालो नाही. पण यावेळी आम्ही काॅंग्रेससाठी सुखाने बिनविरोध निवडणूक होऊ देणार नाही, यात खूप काही आलं, असा सूचक इशारा देखील पाटील द्यायला विसरले नाहीत. त्यामुळे आता भाजप माघार घेणार की मग निवडणूक लढवून काही चमत्कार घडवणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT