Deepmala Kale News: जळगाव महापालिकेच्या भाजपच्या महापौर दीपमाला काळे यांच्या वाहनावर गुरुवारी हल्ला झाला होता. महापालिका कार्यालयाच्या आवारातच हा प्रकार घडला. त्यावरून आता वाद निर्माण झाली आहेत.
या प्रकरणात महापौरांनी आयुक्त आदित्य जीवने यांच्यासह अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली. महापालिकेची महासभा शुक्रवारी झाली. ही महासभा महापौरांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याने गाजली.
महापौर काळे यांच्या वाहनावर हल्ला झाला. याबाबत आयुक्तांनी पोलिसात तक्रार देताना 'महापौरांच्या मौखिक आदेशावरून'असे विधान का केले? अशी विचारणा करीत महापौरांनी आयुक्तांना धारेवर धरले. महापौरांवरील हल्ला ही महापालिका प्रशासनाची जबाबदारी नाही का? अशी विचार करण्यात आली.
महापालिका अतिक्रमण विभागाच्या कारवाईवरून हे प्रकरण घडले होते. उसाच्या गुऱ्हाळाची गाडी काढल्याने युवकांनी महापौरांवर हल्ला केला होता. अतिक्रमण विभागाचे कर्मचारी कारवाई करताना दुजाभाव करतात. कायमस्वरूपी अतिक्रमण तसेच ठेवून फिरत्या विक्रेत्यांवर कारवाई करतात असा गंभीर आरोप करण्यात आला.
उपमहापौर मनोज चौधरी, नगरसेवक पटेल, नगररचना अभियंता मनोज शर्मा यांचा विविध पदाधिकाऱ्यांनी या चर्चेत भाग घेतला. शहरातील गणेश कॉलनी भागातून महापालिका अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी लक्ष्मण या नागरिकाकडून थेट महापौरांच्या नावानेच वसुली केली. ही वसुली करताना पंधराशे रुपयांची पावती फाडली, असे देखील सांगण्यात आले.
अतिक्रमण विभागाचे कर्मचारी थेट महापौरांच्या नावानेच हप्ते वसुली करतात. महासभेतच महापौरांनी त्यावरून प्रश्नांची सरबत्ती केली. तसेच अतिक्रमण विभागाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उभे केले. नगरसेवक पटेल यांनी भंगार बाजाराचा 29 गाळ्याचा प्रश्न उपस्थित केला. त्यावरून त्यांनी महापालिकेला थेट आव्हान दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.