“Police failed to control the violent attempt on Gunaratan Sadavarte in Jalna.” Sarkarnama
महाराष्ट्र

Gunratan Sadavarte Video : मराठा बांधवांचा गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न; पोलिसही रोखू शकले नाहीत...

Gunaratan Sadavarte Faces Attack Attempt in Jalna : मुंबईतील मनोज जरांगे यांच्या आंदोलनादरम्यान गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांना डिवचणारी अनेक विधाने केली होती. आंदोलनाविरोधातही त्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

Rajanand More

थोडक्यात महत्वाचे :

  1. वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर जालन्यात हल्ल्याचा प्रयत्न झाला, काही मराठा बांधवांनी त्यांच्या वाहनावर हाताने प्रहार केला.

  2. पोलिस बंदोबस्त असूनही हा प्रकार घडला, अचानक हल्ल्यामुळे पोलिसांची धांदल उडाली आणि आरोपींना तातडीने पकडण्यात आले.

  3. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाविरोधात सदावर्ते यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे या हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते.

Gunaratan Sadavarte latest news : मराठा बांधवांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. सदावर्ते हे जालना शहरात आलेले असताना काही मराठा बांधवांनी त्यांच्या वाहनावर हाताने प्रहार केले. विशेष म्हणजे यावेळी पोलिसही त्याठिकाणी उपस्थित होते. त्यांची नजर चुकवून मराठा बांधवांनी गुणरत्ते यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला.

धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश व्हावा, या मागणीसाठी काही जण जालना शहरात उपोषण करत आहेत. येथील उपोषणकर्त्यांना भेट देण्यासाठी सदावर्ते चालले होते. याचवेळी काही मराठा बांधवांनी त्यांचे वाहन अडविण्याचा प्रयत्न केला. सदावर्ते यांच्या वाहनापुढे पोलिसांचेही एक वाहन होते. तसेच पोलिसांनी सदावर्ते यांच्या जाण्याच्या मार्गावर ठिकठिकाणी बंदोबस्तही तैनात केला होता.

पोलिसांना सदावर्ते यांना अडविण्याचा किंवा त्यांच्या हल्ला होण्याचा प्रयत्न होऊ शकते, याची कुणकुण लागलेली असावी. त्यामुळे सदावर्ते वाहन जाणार असलेल्या मार्गावर मराठा बांधवांना रोखण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एकाठिकाणी सदावर्ते यांच्या वाहनापुढे असलेले पोलिसांचे वाहन थांबले आणि मराठा बांधवांना अडविण्याचा प्रयत्न केला.

सदावर्ते यांचे वाहन त्याठिकाणी येताच काही मराठा बांधवांनी पोलिसांची नजर चुकवून हल्ल्याचा प्रयत्न केला. वाहनाच्या काचांवर त्यांनी हाताने जोरदार प्रहार केले. अचानक हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने पोलिसांचीही तारांबळ उडाली. पोलिसांनी तातडीने कार्यकर्त्यांना पकडले आणि वाहनाला वाट मोकळी करून दिली.

दरम्यान, मुंबईतील मनोज जरांगे यांच्या आंदोलनादरम्यान सदावर्ते यांनी त्यांना डिवचणारी अनेक विधाने केली होती. आंदोलनाविरोधातही त्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर हायकोर्टाच्या आदेशामुळे आंदोलनावर काही बंधने आली होती. त्यामुळे जालन्यात आलेल्या सदावर्ते यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

Q1: गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला कुठे झाला?
A: जालना शहरात.

Q2: हल्ल्याचा प्रयत्न कोणी केला?
A: काही मराठा बांधवांनी.

Q3: पोलिस घटनास्थळी होते का?
A: होय, पोलिस बंदोबस्त होता पण तरीही हल्ल्याचा प्रयत्न झाला.

Q4: हल्ल्याच्या मागचे कारण काय मानले जाते?
A: मनोज जरांगे यांच्या आंदोलनाविरोधातील सदावर्ते यांच्या विधानं व कायदेशीर कारवाईमुळे संताप वाढल्याचे मानले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT