Jayant Patil Sarkarnama
महाराष्ट्र

(Video) Rane vs Thackeray : राणे-ठाकरेंच्या राड्यात जयंत पाटलांचं डेअरिंग...

Pradeep Pendhare

Mumbai News : सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावर ठाकरे-राणे समर्थकांमध्ये चांगलाच राडा झाला. आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते राजकोट किल्ल्यावर गेले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची पाहणी करत होते.

तिथे ठाकरे आणि राणे समर्थक एकमेकांना भिडले. तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यावर महाविकास आघाडीचे नेते जयंत पाटील यांनी नीलेश राणे यांच्याशी चर्चा केली. जयंत पाटील यांनी प्रंसगावधान राखत मध्यस्थी करत केलेल्या डेअरिंगची चर्चा सुरू आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा वादळी पावसात कोसळला. आठ महिन्याभरापूर्वी या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते झाले होते. पुतळा कोसळण्याच्या घटनेवरून राज्यात संतापाची लाट उसळली आहे. महाविकास आघाडीने राज्यातील सरकारला या मुद्यावरून धारेवर धरले आहे. या पडलेल्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते सिंधुदुर्ग इथं गेले होते.

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासमवेत काँग्रेस (Congress) नेते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार वैभव नाईक यांच्यासह प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते. पुतळा कोसळलेल्या ठिकाणीची पाहणी करत असताना तिथे माजी खासदार नीलेश राणे तिथे आले. त्यानंतर भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे तिथे आले. राणेंनी आदित्य ठाकरे यांना टार्गेट केले.

यावरून राणे आणि ठाकरे समर्थकांमध्ये राडा सुरू झाला. राजकोट किल्ल्यावर राणे आणि ठाकरे गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. कोण-कोणाला मारत होते, हेच कळत नव्हते. नीलेश राणे भूमिकेवर ठाम राहत, ठाकरेंसह महाविकास आघाडीला विरोध केला. ठाकरे समर्थक देखील आक्रमक झाले. आदित्य ठाकरेंनी पुतळा कोसळल्याच्या ठिकाणी सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी ठिय्या आंदोलन सुरू केले.

तणावाची परिस्थिती अधिकच चिघळली. पोलिसांवर देखील ताण आला होता. जयंत पाटील यांनी पुढाकार घेत नीलेश राणे यांच्याशी चर्चा केली. या दोघांमध्ये चर्चा झाल्यानंतर राणे समर्थक काहीसे शांत झाले. यानंतर पोलिस बंदोबस्त आणि समर्थकांच्या गराड्यात आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीचे नेते किल्ल्याहून बाहेर पडले. या सर्व तणावाच्या परिस्थिती किल्ल्यात डझनभर नेते होते. परंतु जयंत पाटील यांच्या डेअरिंगची चर्चा संपूर्ण सिंधुदुर्गसह राज्यात होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT