Jayant Patil News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे दोन दिवसांपूर्वी विधीमंडळात आले होते. त्यांच्या पक्षांच्या आमदारांची बैठक त्यांनी एकनाथ शिंदेंच्या दालनात घेतली. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आणि शिंदेंच्या शिवसेनेची जवळीक वाढत असल्याची चर्चा आहे. मात्र, या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
'
बीबीसी मराठी'शी बोलताना पाटील म्हणाले की, 'लिफ्टमधून बाहेर येताना पहिली रुम एकनाथ शिंदेसाहेबांची आहे. त्यामुळे त्याठिकाणी आमच्या पक्षाचे सर्व आमदार आणि खासदार बजरंग बप्पा यांनी साहेबांना भेटायची इच्छा व्यक्त केली.'
'त्यामुळे जवळची जी रुम आहे त्यामध्ये बसून आमच्या पक्षाची मिटींग झाली. त्यावेळी पवारसाहेब आलेत म्हणून एकनाथ शिंदेसाहेब तेथे आले आणि पवारसाहेबांची भेट घेतली. त्यांची पवारसाहेबांच्या प्रकृतीची चर्चा केली. आणि शिंदेसाहेब आजारी होते म्हणून पवारसाहेबांनी देखील त्यांच्या प्रकृतीची चर्चा केली. या पलीकडे काही नाही.दालनाच्या वापर बैठकीसाठी आम्ही केला.'
शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएसोबत जाणार असल्याच्या चर्चांबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले, एनडीएसोबत जाण्याच्या चर्चा आहेत त्याबाबत मी ऐकलेले नाही. आम्ही महाविकास आघाडीसोबत आहोत. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेतली म्हणजे ते राममंदिरातील दानचोरीवर भूमिका घेतली, सर्वच पक्ष दानचोरीवर बोलतायेत, असे देखील त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.