Jayant Patil  Sarkarnama
महाराष्ट्र

Jayant Patil On Eknath Shinde : 'असल्याच लोकांनी तुमचं नुकसान केलं!', जयंत पाटलांनी एकनाथ शिंदेंसमोरच आगीत ओतलं तेल

Jayant Patil strongly criticised Eknath Shinde : महाराष्ट्र विधानसभेत जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली. “असल्याच लोकांनी तुमचं नुकसान केलं” असे वक्तव्य करत त्यांनी चांगलीच टोलेबाजी केली. संपूर्ण बातमी वाचा.

Rashmi Mane

विधानसभेत आजचा दिवस राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी तापला. महायुतीत नगरपालिकेच्या निवडणुकांदरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदावरून चांगलाच कलगी तुरा रंगला होता. आता हा वाद पुन्हा एकदा विधानसभेत गाजला. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतच अनेक मुद्द्यांना हात घालत चांगलीच टोलेबाजी केली.

लाडकी बहीण योजना राबवताना सुरुवातीच्या काळात ई-केवायसी करणं गरजेच होतं. अनेक लाभार्थ्यांची ई-केवायसी वेळेत न झाल्यानं किंवा चुकीची नोंद भरल्यानं योजना बिघडल्याचा आरोप पाटील यांनी केला. ई-केवायसी न केलेल्यांवर किंवा चुकीची माहिती देणाऱ्यांवर सरकार गुन्हे दाखल करणार का, असा कठोर सवाल त्यांनी केला. याच वेळी त्यांनी आमचा शिंदेंना कायम पाठिंबा असल्याचंही नमूद केलं आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे पाहून, “आमचा एकनाथ शिंदेंना पाठिंबाच आहे. काय प्रोब्लेम नाही ना म्हणत” असा टोला मारल्यानं सभागृहात हशा पिकला.

पाटील यांचं म्हणणं होतं की, लाडकी बहिण योजना सुरू झाल्यानंतर राज्य सरकारला त्याचा राजकीय फायदा झाला. पाटीस पुढे म्हणाले की, 'या लाडक्या बहीण योजनेमुळे राज्य सरकार येण्यात फायदा झालाच, पण एक नंबरचा आमचा माणूस दोन नंबरला जाऊन बसला हा महाराष्ट्राचा मोठा तोटा झालेला आहे. त्यामुळे EKYC व्यवस्थित झालेलं नाही यासाठी तेव्हा पासूनच्या ज्या मंत्री महोदय होत्या त्यांना जबाबदार धरला पाहिजे. पण या योजनाचं श्रेय ज्यांच्या वाट्याला जायला हवं होतं, त्यांना बाजूला सारण्यात आलं. त्यामुळे ज्यांच्या हातात योजना होती, त्यांची जबाबदारी नीट तपासली पाहिजे, असं ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, 'एकनाथ शिंदे साहेब असल्याच लोकांनी तुमचं नुकसान केलं. ते तुम्हाला सारखं समजून सांगत आहेत. काही हरकत नाही. पण एक नंबर हा एक नंबरच असतो', असं सांगत त्यांनी काही व्यक्तींवर अप्रत्यक्ष टोलेही मारले. ज्या व्यक्तीने योजना ज्या माणसाने ही योजना आणण्याचं काम केलं त्या माणसावर अन्याय होतोय असं आम्हाला वाटायला लागलं.'आहे.

शंभूराजे देसाई यांनी एक नंबर–दोन नंबरच्या राजकारणावर भाष्य करताना काही वक्तव्यं केलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील म्हणाले की, आज एक नंबरची व्यक्ती इथे नाही म्हणून असे बोलले जात आहे. जर दोन नंबरचा माणूस पुढील पाच वर्षांत पहिल्या क्रमांकावर जाणार असेल, तर ते उघडपणे जाहीर करावं, अशी मागणी त्यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT