महाराष्ट्र

कंगनाचं स्वातंत्र्याबद्दलचे 'ते' वक्तव्य बरोबरच...

सरकारनामा ब्युरो

मुंबई : ''कंगना राणावत गेल्या दोन वर्षांपासून जे बोलत आहे, ती तिची वैयक्तिक मते आहे. भारतीय स्वातंत्र्याबाबत वक्तव्याला तिची कारण असू शकतात. मी दुजोरा दिला त्याला माझीही करणे आहेत. कंगनाशी माझी ओळख नाही आम्ही काम केलं नाही. पण खरे स्वातंत्र्य १८ मे २०१४ ला मिळाले या गोष्टीवर मी आजही सहमत आहे. त्याला मी दुजोरा दिला त्यालाही माझी स्वतः ची कारणे असू शकतात, असे म्हणत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी कंगनाच्या स्वातंत्र्याबद्द्लच्या त्या वक्तव्याला पुन्हा दुजोरा दिला आहे.

अभिनेत्री कंगना राणावतने (Kangana Ranout) केलेल्या स्वांतत्र्याबद्दलच्या वक्तव्यावा विक्रम गोखले यांनी दुजोरा दिला. यानंतर देशभरातून त्यांच्यावर टीका करण्यात आली. त्यांचे विरोधक आणि समर्थन एकमेकांमध्ये भिडले. या सर्व घडामोडींवर विक्रम गोखले यांनी पत्रकार परिषद घेत आपली भुमिका स्पष्ट केली आहे.

याबाबत स्पष्टीकरण देताना त्यांनी १८ मे २०१४ रोजी इंग्रजी वर्तमान पत्राचा संदर्भ दिला आहे. ''कंगनाने स्वातंत्र्याबाबत जे वक्तव्य केले आहे ते जाणून घेण्यासाठी तुम्ही १८ मे २०१४ चे द गार्डियन वर्तमानपत्र वाचा, ते वाचल्यानंतर कंगनाने केलेल्या वक्तव्यात कोणताही फरक नाही हेच तुम्हाला दिसेल. त्या इश्यूची माझ्याकडे त्याची कॉपी आहे. त्यामुळे कंगना काही चुकीचं बोलली नाही, असं मी म्हणालो.

"आपल्याला सो कॉल्ड १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र मिळाले. तत्त्कालीन पंतप्रधानांचे स्वाक्षरीचे २८ एप्रिल १९४८ रोजी चं एक लेटर माझ्याकडे आहे. लॉर्ड माऊंट बॅटन यांना विनंतीचे पत्र आहे. त्यामुळ मलाही असचं वाटतं की, २०१४ लाच खरे स्वातंत्र्य मिळाले,'' असंही त्यांनी सांगितलं.

''पण त्यावेळी मिळालेल्या सो कॉल्ड स्वातंत्र्यासाठी ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिले, मला त्यांचा अपमान करायचा नाही. मी त्यांचा खुप आदर करतो. स्वातंत्र्याबद्दल बोलणाऱ्या कंगना राणावत आणि विक्रम गोखलेंशी तुम्ही संबंध तोडू शकता, त्यांना काम देणं बंद करु शकता, पण गार्डियनच काय, तुम्ही ते बंद करु शकता का,'' असा सवालही विक्रम गोखलेंनी केला आहे.

''मला कोणत्याही पुरस्काराची गरज नाही, मी माझ्या आयुष्याची वीस वर्षे पुरस्कार रिफ्युज करायला केले आहेत. वीस वर्षे पुरस्कार नाकारुन मी स्टंट केले नाहीत. मी आणि बॉलीवूडचा एक अॅक्टर असे दोनच व्यक्ती आहेत. पण माझ्यावर गेल्या काही दिवसांपासून ज्या टीका टीपण्ण्या होत आहे, त्या मी माझ्या बाजूने या क्षणापासून पडदा टाकला आहे.''

''माझ्यावर घाणेरड्या भाषेत टिका करत आहेत त्याच्यावर मी भाष्य करत नाही. कारण त्यांना माझ्याबाबत जाणून घ्यायला वेळ नाही. त्याच्याबाबत माझी कोणतीही तक्रार नाही. मात्र आज याठिकाणी मी माझ्याबद्दल जो गोंधळ सुरु आहे, त्याबाबत माझ शेवटचं स्पष्टीकरण द्यायला आलो आहे. यानंतर मी या विषयावर काहीच बोलणार नाही.'' असही त्यांनी स्पष्ट केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT