karuna munde

 

sarkarnama

महाराष्ट्र

करुणा मुंडेंचे मोठे पाऊल : शिवशक्ती पक्षाची स्थापना, एका मंत्र्यांच्या पत्नीचा लवकरच प्रवेश

परळी वैजनाथ या विधानसभा मतदारसंघातून आपले पती धनंजय मुंडे Dhananjay Munde) यांच्याविरुद्धही निवडणूक लढण्यास मागेपुढे पाहणार नाही,'' असे मुंडे म्हणाल्या.

सरकारनामा ब्युरो

नगर : राष्ट्रवादीचे नेते, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या पत्नी करुणा मुंडे (Karuna Munde) यांनी आज नव्या पक्षाची स्थापना केली आहे. त्यांच्या पक्षाचे नाव 'शिवशक्ती सेना' (ShivShakti Sena) असं आहे. ''शिवशक्ती पक्षाची अधिकृतपणे स्थापना करण्यासाठी ३० जानेवारी २०२२ रोजी अहमदनगरला मोठा मेळावा घेणार असून यावेळी लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहतील. त्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत तुळजाभवानीचे दर्शन घेऊन संपूर्ण महाराष्ट्राच्या दौरा करणार आहे,'' असे मुंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

''अनेक पक्षांनी मला आपल्या पक्षात येण्याचे आमंत्रण दिले, मात्र मी स्वतःचा पक्ष स्थापित करण्याचा निर्णय घेतला,'' असे करुणा मुंडे म्हणाल्या. '' काही मंत्र्यांच्या बायकांनीही माझ्याशी संपर्क केला असून त्यांनी माझ्या पक्ष स्थापनेला पाठिंबा दिला, असा दावा करुणा मुंडे यांनी केला आहे. ''आमच्या पक्षात सर्वसामान्य जनतेला स्थान असेल. वेळ पडली तर आपण बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ या विधानसभा मतदारसंघातून आपले पती धनंजय मुंडे Dhananjay Munde) यांच्याविरुद्धही निवडणूक लढण्यास मागेपुढे पाहणार नाही,'' असे मुंडे म्हणाल्या.

करुणा मुंडे (Karuna Munde) म्हणाल्या की, राज्याला भ्रष्टाचार मुक्त करणे, गरीब व्यक्तीवर होत असलेले अन्याय दूर करण्यासाठी शिवशक्ती पक्षाची स्थापना करण्यात येत आहे. मी गेल्या २५ वर्षांपासून अनेक यातना सहन केल्या आहेत. त्यामुळे आता घराबाहेर पडून पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे,''

धनंजय मुंडेंना पक्षात स्थान नाही

एक वर्षांपासून मी जीवन ज्योती सामाजिक संस्थेच्या माध्यमातून काम सुरू केलेले आहे. मात्र अनेक क्षेत्रात भ्रष्टाचार होत असल्याचे दिसते. . पोलिसांचा वापर कसा होतो मी पाहिलं आहे. सर्वसामान्य व्यक्तींना न्याय देण्यासाठी या पक्षाची स्थापना केली असल्याचे करुणा मुंडे यांनी सांगितलं, ''आता मी माझे जीवन जनसेवेसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील जनतेला आवाहन आहे की एकत्र या, मी एक नवी सुरुवात करत आहे. चांगल्या लोकांचा पक्ष काढू, यामध्ये माझ्या पतीलासुद्धा स्थान देणार नाही,' असे मुंडे म्हणाल्या.

''आघाडी सरकार मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) एका मंत्र्यांच्या पत्नीने माझ्या पक्षात येण्यास सहमती दाखवली आहे, योग्य वेळी मी ते नाव जाहीर करेल,'' असा गौप्यस्फोट त्यांनी केला. पक्षाचे चिन्ह, पक्षाचा झेंडा, बोधचिन्ह आणि निवडणूक लढवण्या संदर्भातली आचारसंहिता जाहीर केली जाणार असल्याची माहिती करुणा शर्मा यांनी दिली आहे.

कोण आहेत करुणा मुंडे (शर्मा)

करुणा मुंडे (शर्मा) हे नाव महाराष्ट्रात सर्वांत पहिल्यांदा चर्चेत आलं जानेवारी 2021 मध्ये. त्याआधी केवळ राजकीय वर्तुळांमध्ये आणि दबक्या आवाजात त्यांच्या नावाची चर्चा होती. मुंबईतील एका महिलेने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून करुणा शर्मा यांच्याशी असलेल्या नात्याबद्दल माहिती उघड केली.

त्यानंतर धनंजय मुंडेंनी फेसबुक पोस्ट शेअर केली होती यात ते म्हणाले होते की, करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधात होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती. या परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी झाली. दोन्ही मुलांना मी माझं नाव दिलंय. शाळेच्या दाखल्यापासून सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे, ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT