Mumbai News : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते धनंजय मुंडे सध्या विविध कारणांमुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. याचदरम्याम आता कौटुंबिक प्रकरणांत मुंडे दोषी ठरले आहेत. वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने मुंडे यांना झटका देताना त्यांना कौटुंबिक हिंसा प्रकरणात दोषी ठरवले आहे. करूणा मुंडेंना दरमहा 2 लाखांची पोटगी देण्याचे आदेशही कौटुंबिक न्यायालयाने दिले आहेत. यानंतर करुणा मुंडे यांनी माध्यमांसमोर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याविरोधात अनेक आरोप केले आहेत. सध्या यामुळे राज्यात जोरदार चर्चा सुरू झाली असतानाच करुणा शर्मा यांनी थेट महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार टीका करताना, कोण चाकणकर असा हल्लाबोल केला आहे.
करुणा शर्मा यांना, न्याय मागण्यासाठी महिला आयोगात गेला होतात का? असा सवाल विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना करुणा शर्मा भडकल्या. त्यांनी, कोण महिला आयोग? रुपाली चाकणकर? काय म्हणायचं आहे तुम्हाला? महिला आयोगात केवळ नेते लोकांना पाठिशी घालण्यासाठी आहे. रुपाली चाकणकर यासाठीच तिथे बसल्यात, असा घणाघात केला आहे.
रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाचे अध्यक्ष बनवलय अवघड आहे. मी राष्ट्रीय महिला आयोगात गेले आहे. मी दिल्लीत जाऊन पैसे खर्च करत त्यांना निवेदन दिलेली आहेत. रुपाली चाकणकरांना महिला आयोगातून हटवा, अशी मागणी देखील राष्ट्रीय महिला आयोगाला केल्याचं करुणा शर्मा म्हणाल्या.
यावेळी करूणा शर्मा यांनी, आयोगाकडे खूप काही तक्रारी असतात. पण आजपर्यंत चाकणकर यांनी काय केलं? काहीही नाही. मात्र आता न्यायालयात लढून लढून मला लॉ काय आहे? हे समजायला लागलं आहे. जो आरोपी आहे, ज्याच्या विरोधात तुमच्याकडे तक्रारी आल्या आहेत. त्याच्यासोबत तुम्ही फोटोत एकत्रित येऊ नये, असा लॉ आहे. पण रुपालीताईंनी धनंजय मुंडेंची बाजू मांडलीये. ते आरोपी आहेत ना? माझी मुंडेंच्याबाबत तक्रार आहे रुपालीताईंकडे. खूप तक्रारी आहेत, पण आजपर्यंत चाकणकर यांनी काहीही केलेलं नसल्याचा दावा देखील करुणा शर्मा यांनी केलाय.
आता न्यायालयाने न्याय दिला असून धनंजय मुंडेंना वाटतं की, कुठेतरी सेटलमेंट व्हायला पाहिजे. ही आर्थिकरित्या कमजोर झाली तर ही थांबेलही, त्यांना वाटतं. तर मी त्यांच्यासोबत लिव्ह इनपमध्ये होते. हे दाखवण्यासाठी मी सही करावी, असही त्यांना वाटतं. धनंजय मुंडे हे नाव मी हटवावं, असं काहीतरी त्यांना हवं आहे. मात्र, ते काही मी काही करणार नाही, असही करुणा शर्मा यांनी म्हटलंय.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.